Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):- शासकीय विश्राम गृह पुणे(ib)येथे काल शासन नियुक्त नूतन सदस्यांचा जाहिर सत्कार ज्येष्ट पत्रकार अरुण खोरे,व विभागीय माहिती उपसंचालक मा.यशवंत भंडारे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
   पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सत्कार समारंभासाठी अधिस्वीकृती समितीचे राज्यस्तरीय सदस्य मा एस एम देशमुख,मा.किरण नाईक,मा.संतोष पवार,तसेच पुणे विभागातून नियुक्त झालेले मा.सुभाष भारद्वाज,राजा माने,मा.विठ्ल जाधव,मा.स्वप्नील बापट,मा.सचिन घाटपांडे हे उपस्थितहोते.
या सत्कार सोहळयास मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य शरद पाबळे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता सुर्वे,सुनील वाळुंज,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पुजारी,प्रभाकर क्षीरसागर, तुळशीदास घुसाळकर,संदीप बोडके,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ,भोर वेल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत किद्रे,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ़ नाना भोंगळे,सुनील लोणकर दौड पत्रकार संघाचे एम् जी शेलार,विनायक कांबळे,लोणावळा येथील ज्येष्ट पत्रकार श्रीराम कुमटेकर ,पुणे शहर पत्रकार संघाचे सदस्य शाहनवाज तांबोळी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वांचे स्वागत पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.

Post a Comment

 
Top