Add

Add

0
पौड(प्रतिनिधी)ः-मुळशी तालु्नयातील सर्व शासकीय कार्यालये एकाच प्रशासकीय कार्यालयात आणण्यासाठी शासनाने पौडयेथील तहसिलदार कचेरीच्या ठिकाणावर सुमारे 11कोटी प्रस्तावीत खर्चाची ‘नवीन प्रशासकीय इमारत’उभारावी व त्यासाठी तात डीने आर्थिक तरतूद करावी अशी मागणी मुळशी तालुका भाजपा च्या वतीने मुळशी -हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे,भोर विधानसभा अध्यक्ष अशोक साठे,तालुका अध्यक्ष अॅड.सचिन सदावर्र्तेे आदिंनी राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष बापट यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
    मुळशी तालु्नयाचे मुख्यालय पौड येथे असून सर्व शासकीय कार्यालये पौड येथे आहेत.मुळशी तालु्नयाचा बहुसंख्य भाग हा डोंगरी व दुर्गम असून तालु्नयाचेे विस्तारीत क्षेत्रफळ विस्तृत अस ल्याने जवळ जवळ सर्वच शासकीय विभागाची कार्यालये पौड येथेच आहेत.सदरचे तालुका ठिकाण हे पुण्यापासून 35 किमी अंतरावर,पुणे-कोलाड रस्त्यावर आहे.पौड येथे एकूण लहान मोठी 14 विविध शासकीय विभागाची कार्यालये आहेत.ही सर्व कार्यालये वेगवेगळ्या भागात विखुरलेली असून 14 शासकीय कार्यालर्यॉंपैकी 4 कार्यालयांना स्वतंत्र इमारती नसल्याने सदरची कार्यालये ही खाजगी व अपुर्‍या भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत.एकूण 9 कार्यालयांची स्थिती जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतीत आहेत,तसेच अपुर्‍या शासकीय जागेत कार्यरत आहेत.तालु्नयाच्या अत्यंत डोंगरी व दुर्गम भागातून येणार्‍या नागरिकांना एकाच दिवशी या सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधणे व आपली विविध स्वरूपाची शासकीय कामे करून घेणे त्यामुळे अत्यंत कठीण होते.या सर्व परिस्थितीचा विचार करता पौड येथे एकत्रीत व अद्यावत,सर्व सुविधायुक्त व सर्व जनतेला सहज सोयीची अशी ‘प्रशासकीय इमारत’बांधणे अत्यंत गरजेचे असून त्यास्वरूपाची मागणी सर्वच संबंधीत शासकीय कार्यालयांनी शासनाकडे वारंवार केलेली आहे.
 पौड येथील‘नवीन प्रशासाकीय इमारती’साठी पौड येथे शासकीय जमीन स.नं.198चे एकूण क्षेत्र 75.40आर क्षेत्र उपलब्ध आहे.या मिळकतीवर सध्या असणारी ‘तहसिल-मुळशी’ची इमारत सुमारे शंभर वषॉंपेक्षा जास्त जुनी असून सध्या अस्तित्वात असेली जुनी इमारत पाडून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग-दक्षिण विभाग,पुणे,द्वारे सदर कामाचे ढोबळअंदाजपत्रक,मा.उपमुख्यवास्तुशास्त्रज्ञ,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,पुणे यांचे पत्र जा.क्रं.पुणे-301/233/सन 2011दि.2-7-2011सोबत जॉब क्रं.301-233 नकाशा क्रं.1ते 4 नुसार सादर केलेले आहे.
  या अंदाजपत्रकामध्ये पुढील काही कामाच्या तरतुदी करण्यात आल्याचे समजते..इमारतीचा तळमजला-3401.04चौ.मीटर बांधकाम क्षेत्रफळ,पहिला मजला-3401.04 चौ.मीटर,पार्किमंग मजला-911.04 चौ.मी.सदर इमारतीस उपलब्ध भूखंडास संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे,इमारतीस अंतर्गत विद्दुयीतीकरण व रस्त्यावरील दिवाबत्ती करणे,ट्रान्सफॉर्मर बसविणे,सभागृह व कॉन्फरंस हॉलसाठी वातानुकुलीत सुविधा पुरविणे,बाह्य पाणीपुरवठा व मलनिस्सारण करणे,जोडरस्ते व पादचारी मार्ग करणे, लँडस्केपिंग व गार्डनिंग करणे,भूखंड सुधारणा करणे,आग्निशामक व्यवस्था करणे,सभागृह व कॉन्फरंस हॉलसाठी फर्निचर व बैठक व्यवस्था करणे,सभागृह व कॉन्फरंस हॉलसाठी ध्वनीयंत्रणा उभारणे,जमीनीत व इमारतीवर पाण्याची टाकी बांधणे व पंप हाऊस बांधणे,वॉचमन केबीन व ध्वजवंदनासाठी फ्लॅगपोस्ट बसविणे व फ्लॅटफॉर्म बांधणे,जलसंवर्धन उपाययोजना करणे आदिंचा समावेश करण्यात आलेला आहे.यासाठी देय असलेला चटईक्षेत्र निर्देशांक-1.00 इतका होता.पौड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव 2011मध्ये आमदार संग्राम थोपटे यांनी सादर केलेला असून सदरचे अंदाजपत्रक पुणे प्रादेशिक विभागाच्या सन. 2011-2012च्या मंजूर दर सूचीनुसार आधारित आहे.त्यावेळी सदरच्या कामाची अंदाज पत्रकीय किंमत रूपये 10,78,82,238 रूपये इतकी करण्यात आलेली होती.परंतुतत्कालीन आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याला अंतीम स्वरूप येऊ शकलेले नाही.
  म्हणूनच राज्यातील भाजपा-शिवसेना शासनाकडे या कामाचा पाठपुरावा करण्याचा चंग भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी बाळगला असून या कामाची मागणी दि.1जुलै2015 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,बांधकाममंत्री ना.चंद्रकांत पाटील(दि.5 ऑगस्ट-2015)व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष बापटयांच्याकडे प्रत्यक्ष भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे.पौड येथील ‘नवीन प्रशासकीय इमारती’साठी सध्याच्या प्रचलित दरसूचीनुसार आर्थिक तरतूद करावी अशी विनंती संबंधीतांना करण्यात आलेली आहे.मुख्यमंत्र्यांनी व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यनी त्यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री .गिरीष बापट यांच्याकडे पत्रव्यव्हार केला असून पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्याची सूचना केली असल्याचे समजते.
 पौड येथे ‘नविन प्रशासकीय इमारत’ लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्य शासनाच्या संबंधीत विभागाकडे शासकीय तसेच राजकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात असून त्याला निश्चित यश प्राप्त होईल असा ठाम विश्वास मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

 
Top