Add

Add

0
६ ऑक्टोबरपासून तुमच्या जवळच्या मुव्ही स्क्रीन्सवर
कोणताही सिनेमा म्हटला की, पहिले डोळ्यासमोर येते त्या सिनेमाचे पोस्टर.त्यावरूनच सिनेमा कसा असेल याचा अंदाज रसिक बांधतात.हे पोस्टरच सिनेमाविषयीचा पहिला संवाद साधते आणि रसिकां च्या मनात एक घर करते.काळ्या फळ्यावर खडूने चित्रपटाचे नाव लिहिण्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड काळाबरोबर आणि पिढी बरोबर बदलत गेला,हाताने रंगवलेले पोस्टर, प्रिंटेड पोस्टर, एवढेच नव्हे तर थ्रीडी पोस्टर्स...आणि आताराजवाडे अँड सन्सया नावातच पुढची पिढी निदर्शित करणार्‍या या चित्र पटाच्या माध्यमातूनडिजीटल पोस्टरपर्यंत आला आहे.डिजीटल पोस्टरची आगळी वेगळी संकल्पना घेऊन येणारा हा सिनेमा दि.१६ऑक्टोबरपासून तुमच्या जवळ्यामुव्ही स्क्रीन्सवरयेत आहे. 
अगदी सुरूवातीला केवळ काळ्या फळ्यावर खडूने चित्रपटाचे नाव लिहिले जात,मग हळूहळू चित्रभाषा ही वापरली जाऊ लागली.त्यात रंग अवतरले परंतु खडूंच्या रुपाने.ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या जमा न्यात पोस्टरही ब्लॅक अँड व्हाईटच होते, केवळ चित्रपटगृहाच्या गेटवरच लागणारे हे पोस्टर्स पेंटर्स स्वत: रंगवत असत. तेव्हा सुरू झालेला रंगीत पोस्टर्सचा ट्रेंड नंतर काळाबरोबर झपाट्याने वाढत गेला. हे पोस्टर्स चित्रपटगृहाच्या गेटपर्यंत न राहता पानटपर्‍या, रिकाम्या भिंती, दुकानांच्या पत्र्यांवर जाऊन पोहचले. मग पुढे त्यात अधिक सुबकता आणि आकर्षकता आणत प्रिंटेड, चमक असणारे पोस्टर्स आले. आता तर रस्तोरस्ती, रिक्षा, दुकाने, खांब मिळेल तेथे ते रसिकांचे लक्ष वेधून घेतात. हे पोस्टर्स केवळ चित्रपटाची कहाणी सांगत नाही तर यांचा बदलता ट्रेंड बदलत्या पिढीबरोबर पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान यांचीही कहाणी सांगतात.म्हणूनच तर थ्रीडी पोस्टर्स आणि आता राजवाडे अँड सन्सघेऊन येत असलेले डिजीटल पोस्टरआकर्षणचा आणि कुतूहलाचा विषय ठरले आहे.
मराठी चित्रपटाची कथा, आशय हाच मराठी रसिकांना विशेष आकर्षित करून घेतो.त्यामुळे मराठी रसि कांना जवळचा,आपल्याशी निगडीत वाटेल असाच विषय घेऊन हा चित्रपट येत आहे.चित्रपट लहानां पासून थोरांपर्यंत सर्वांनाच भावेल असे सगळेच पैलू यात बघायला मिळतात.याचा पहिलाच नमूना घेऊन चित्रपटाचे पहिलेडिजीटल पोस्टररसिकांच्या भेटीस येत आहे.अन्य सर्वच चित्रपटांप्रमाणे याही पोस्टर मध्ये चित्रपटातील बहुतांश पात्र आपल्याला भेटतात, मात्र जराहटके’.आपल्या कुटुंबाची गोष्ट सांगत एक एक पात्र या पोस्टरवर अवतरत आणि पूर्ण होते ती फॅमिली फ्रेम’.

अय्या,हॅपीजर्नी,रेस्टॉरंट,गंधसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अँड सन्सचित्रपटाद्वारे एकाच चित्रपटात अनेक प्रसिध्द कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.यात प्रमुख भूमिकेत अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर,मृणाल कुलकर्णी हे कलाकार दिसतात,तर सतीश आळेकर,ज्योती सुभाष, सिध्दार्थ मेनन,आलोक राजवाडे,मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, पुर्णिमा मनोहर,राहुल मेहंदळे, अमित्रीयन पाटील,सुहासिनी धडफळे यांच्या अभिनयाने वेगळीच मजा आणली आहे.चित्रपटाची कथा आणि पटकथा सचिन कुंडलकर यांचीच असून वाय. एम. देवस्थळी व कॅफे कॅमेरा यांची निर्मिती आहे.

Post a Comment

 
Top