Add

Add

0
पीएससी परीक्षेतील यशस्वीता ईरा सिंघल व निधी गुप्ता यांनी उलगडले यशाचे गमक
पुणे:- ‘‘आपल्या अपयशातील चुकांचे स्व-मूल्यांकन, घेतलेली प्रचंड मेहनत, वेळेचे केलेले योग्य नियोजन आणि आत्मविश्‍वास ही भारतीय लोकसेवा आयोगा च्या (युपीएससी) परीक्षेत यश मिळवण्याची चतु:सूत्री असल्याचे२०१४मधील युपीएससी टॉपर्सनी सांगितले. तळागाळातील वंचितांपर्यंत पोहोचून अधिकाधिक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनात सुधा रणा करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी सिव्हिल सर्विसेस ट्रेनिंग यांच्या वतीने भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिली आलेली ईरा सिंघल आणि तिसरी आलेली निधी गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी दोघींनीही पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला. याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड व स्ट्रॅटेजिक हेड दीपक आपटे (ग्रुप कॅप्टन) उपस्थित होते.
ईरा सिंघल म्हणाल्या,‘‘लहानपणापासूनच देशासाठी सेवा करायची इच्छा होती.संगणकशास्त्रातील पदवीनंतर नोकरी करीत होते.परंतु, आत्मिक समाधान मिळत नव्हते.त्यानंतर या परिक्षेचा अभ्यास सुरु केला. सुरुवा तीला तीनदा अपयश आले.मात्र,प्रत्येकवेळी आलेल्या अपयशाची कारणे शोधून त्यावर मात करत गेले. माझ्यातील अपंगत्त्वाला आव्हान मानून त्याचा सामना केला.स्वत:ला झोकून देऊन उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन करुन अभ्यास केला.’’
 निधी गुप्ता म्हणाल्या, ‘‘मलाही सुरुवातीला अपयश आले. मात्र, खचून न जाता सहनशीलता कायमठेवली. आयुष्यात चढ-ऊतार येत राहणार, या मानसिकतेतून नव्या गोष्टी वाचत गेले. क्षमतांचा नीट अभ्यास केला. चांगल्या बाजू अधिक बळकट केल्या, तर कमकुवत बाजूंचे रुपांतर चांगल्यात केले. आठवड्यातील चैनीचा वेळ कमी केला. ठरवलेला अभ्यास वेळेत पूर्ण केला. अभ्यास करताना ताण येणार नाही, याची काळजी घेत गेले.’’
खासगी शिकवण्यांपेक्षाही स्व-अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो, असेही ईरा यांनी सांगितले. तर निधी गुप्ता म्हणाल्या, शिकवण्यांमुळे अभ्यासातील नवीन गमके कळतात. परंतु, क्लासेसच्या जोरावर यश मिळते, हा समज चुकीचा आहे. पदवीचा अभ्यास करताना मूलभूत संकल्पना समजावून घेणे उपयुक्त ठरते, असे ईरा म्हणाल्या. पर्यायी विषय निवडताना आपल्याला नीट कळलेला निवडावा, असे निधी यांनी सांगितले.

भावी कारकिर्दीविषयी बोलताना ईरा म्हणाल्या, ‘‘प्रशासकीय सेवेतून अधिकाधिक लोकांची सेवा माझ्या हातून घडावी. अपंगत्त्वामुळे येणार्‍या समस्यांची मला जाणीव आहे. त्यामुळे अपंगांच्या अडचणी सोडवण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. दुसर्‍याच्या चेहर्‍यावर कायमआनंद राहील, असे काममला करायचे आहे.’’
निधी गुप्ता म्हणाल्या, ‘‘नागरिकांना नागरी सेवा अधिक सुलभरित्या मिळाव्यात, यासाठी प्रशासनात साधेपणा आणायचा आहे. सेवा देणारे विभाग सक्षमबनवायला हवेत. त्यासाठी माझा नियमित प्रयत्न राहील.’’
या परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी मेहनत, आत्मविश्‍वास, स्व-मूल्यांकन आणि क्षमतांची जाणीव ही चतु:सूत्री कायमध्यानात ठेवली पाहिजे. अपयशाने खचून न जाता चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. देशसेवेसाठी युपीएससीव्यतिरिक्त अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचाही विचार करावा. आपल्या आतला आवाज काय सांगतो, हे तपासून पाहावे. नियमित अभ्यास, विषयाची जाण आणि निर्भीडपणा यामुळे कोणत्याही आपल्याला यश नक्की मिळते, असा सल्ला ईरा आणि निधी या दोघींनीही दिला.
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, ‘‘राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे व प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणार्‍यांना प्रेरणा मिळावी, यासाठी युपीएससी परिक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. ईरा, निधी आणि दुसरी आलेल्या रेणू राज यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील, असा विश्‍वास आहे.’’

Post a Comment

 
Top