Add

Add

0
        डॉ. दाभोळकर हत्या तपास प्रकरण
मुंबई:-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या प्रभावी तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाला (सीबीआय) सहाय्य करण्यासाठी राज्याने पोलीस दलातीलअधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
        डॉ.दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासकार्यात पूर्वी काम केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याची मागणी सीबीआयने राज्याच्या पोलीस विभागाकडे नुकतीच केली होती.त्याला राज्य सरकारने तातडीने प्रतिसाद दिला आहे. त्या नुसार तपासाचा वेग वाढून गुन्हेगारांना लवकर अटक व्हावी यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली आहे. हे अधिकारी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआयला सहाय्य करणार आहे.
          यामध्ये पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस.मडगुळकर,नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश देवरे,यवतमाळचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके,पुण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आदींचा समावेश आहे.

Post a Comment

 
Top