Add

Add

0
पुणे :- पुणे स्थित गार्डियन डेव्हलपर्स या रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्‍वासार्ह आणि नावाजलेल्या कंप नीने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक सुखी कुटुंबां ना घरे पुरविली असून,आता या कंपनीतर्फे घर खरेदी साठीची एक क्रांतिकारी योजना राबविण्यात येणार आहे. 
गार्डियन डेव्हलपर्सतर्फे रिअल इस्टेट क्षेत्रात प्रथम च शंभर टक्के कर्जमुक्त आणि व्याजमुक्त घरांची घोषणा करण्यात आली आहे,ज्यामुळे ग्राहकांना गृह कर्जाच्या आणि त्याच्या व्याजाच्या बोज्यापासून पूर्णपणे दिलासा मिळणार आहे.यासंबंधीची घोषणा आज रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत गार्डियन डेव्हलपर्सचे अध्यक्ष मनीष साबडे यांनी केली. याप्रसंगी कंपनीचे संचालक उदय जाधव व मुख्य विपणन अधिकारी काजल मलिक आदी उपस्थित होते.
ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय लाभदायी असणार्‍या या नावीन्यपूर्ण योजनेविषयी बोलताना मनीष साबडे म्हणाले, की गृहकर्ज फेडीसाठीचा प्रदीर्घ कालावधी, त्यावरील व्याज अशा घटकांमुळे अनेकांना आपले घराचे स्वप्न पूर्ण करता येत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आणि अशा ग्राहकांच्या नेमक्या याच अडचणींवर उपाय म्हणून हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले. अशी अभूतपूर्व आणि आगळीवेगळी योजना प्रथमच राबविली जात असून,ती पुण्यातील चार महत्त्वाच्या लोकेशन्सवर उभारल्या जाणार्‍या भव्य गृह प्रकल्पांसाठी लागू असेल. 
या अभूतपूर्व आणि क्रांतिकारी स्वरूपाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना येत्या २१ ते ३0 ऑगस्ट या कालावधीत कर्वेनगर येथील पंडित फार्म्सला भेट द्यावी लागणार असून, तेथे फक्त एक लाख रुपये भरून सदर योजनेसाठी आपले नाव नोंदवता येणार आहे. 
शंभर टक्के व्याजमुक्त घराची ही विशेष योजना गार्डियन डेव्हलपर्सच्या ईस्टर्न मेडोज (खराडी अँनेक्स), विंडशायर (किरकटवाडी जवळ, सिंहगड रस्ता), ग्रीनशायर (कासारआंबोली,पिरंगुट जवळ) आणि वेस्टशायर (किवळे,पुणे-मुंबई बाह्यवळण मार्ग) या चार महत्त्वाच्या ठिकाणी साकारल्या जाणार्‍या भव्य गृहप्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Post a Comment

 
Top