Add

Add

0
पुणे (वि.मा.का.):-राज्य शासनाने राज्य अधिस्वी कृती समिती आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती सदस्यपदी निवड केलेल्या सदस्यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज येथे सत्कार करण्यात आला.
     प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधी राज्य शासनाने राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नुक तीच स्थापना केली आहे.पुण्याच्या विभागीय अधि स्वीकृती समितीच्या सदस्यपदी दै.लोकमत सोलापूर चे संपादक राजा माने,दै.सामनाचे प्रतिनिधी विठ्ठल जाधव,साम वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी स्वप्नील बापट ,चिंतन आदेशचे सचिन घाटपांडे व साप्ताहिक भविष्यकाळचे संपादक सुभाष भारद्वाज यांचा तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस.एम.देशमुख,किरण नाईक,संतोष पवार यांचा पुण्यातील विभागीय माहि ती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे व ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बापुसाहेब गोरे,जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे,सुनील वाळूंज,शरद पुजारी, तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
00000

Post a Comment

 
Top