Add

Add

0
सध्याच्या तरुण पिढीला निवृत्तीनंतर पेन्शन मिळ ण्याची शक्यता नाही. वृध्दापकाळामध्ये त्यांची आर्थिक कुचंबणा होऊ नये म्हणून सरकारने १ जून २०१५ पासून अटल पेन्शन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. १८ ते ४० वर्षांची व्यक्ती ह्या योजने त पैसे गुंतवू शकते.त्यासाठी बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर इच्छुकव्यक्तीकडे मोबाइल असणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये खाते सुरू करण्याची कार्यपध्दती एकदम सुटसुटीत आहे. ज्या बँकेत खाते आहे त्या ठिकाणी जाऊन एक फॉर्म भरायचा. त्यामध्ये इच्छित पेन्शनच्या रकमेची नोंद करायची. त्यानुसार बँक अधिकारी मासिक, तिमाही आणि सहामाही अंशदानाची रक्कम भरेल. सहचारी किंवा सहचारिणी आणि वारस यांची नावे नमूद करायचीआजची किंमत होते सुमारे १७८ रुपये.त्या व्यक्तीने तिला भरावी लागणारी मासिक ३७६ रु.ची रक्कम (ही रक्कम उदाहरणादाखल घेतली आहे) म्युच्युअल फंडाच्या इक्विटी ग्रोथ योजनेमध्ये एसआयपीद्वारा ३५ वर्षे गुंतविली तर त्या व्यक्तीची ६० व्या वर्षीची गंगाजळी होते सुमारे २४.४२ लाख रु. आणि त्या रकमेवर आयकर वजा जाता ६ टक्के निव्वळ परतावा प्राप्त झाला तरी त्या व्यक्तीला मासिक १२ हजारांची (आयकरमुक्त) कमाई होऊ शकते. आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या वारसाला २४.४२ लाख रुपये मिळतील. विमा कंपन्यांच्या किंवा म्युच्युअल फंडांच्या पेन्शन योजनांमध्येही अटल पेन्शन योजनेइतकाच (म्हणजे भाववाढीच्या दरापेक्षा कमी) परतावा मिळतो. निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्याची अपेक्षा असेल तर थोडे परिश्रम घेऊन स्वत:ची पेन्शन योजना स्वत:च राबविणे हा एकमेव मार्ग आहे.n dilip.samant@yahoo.com
. ह्या फॉर्मबरोबरच खातेदाराने आपल्या बचत खात्यामधून ह्या योजनेत जमा करावयाची मासिक रक्कम भरणा करण्याचे अधिकार बँकेला द्यायचे. आधार नंबर असणे आवश्यक आहे. या योजनेमधील गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये पहिली पाच वर्ष सरकार आपल्या वतीने काही रक्कम जमा करणार आहे. त्यासाठी काही अटी आहेत. १) ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ह्या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल. २) खातेदारांच्या अंशदानाच्या रकमेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १ हजार रु. वार्षिक यापैकी जी रक्कम कमी असेल तितकीच रक्कम सरकार आपल्यातर्फे जमा करणार.३) ज्यांच्या वार्षिक उत्पन्नाला आयकर लागू होत नाही किंवा ज्या व्यक्तींना ईपीएफ किंवा अन्य सामाजिक सुरक्षेची सुविधा नाही अशा व्यक्तींसाठीच ही सरकारी अंशदानाची सुविधा उपलब्ध आहे. खातेदाराने जमा करावयाची रक्कम खालील कोष्टकानुसार असेल. खातेदाराच्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत वर निर्देशित केलेली रक्कम भरल्यानंतर त्याला आजन्म पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. खातेधारकाला फक्त पेन्शनच मिळेल. जमा रक्कम मिळणार नाही. ६० वर्षांच्या अगोदर खातेदाराच्या मृत्यूच्या किंवा दुर्धर आजाराच्या संभावनेमध्ये त्याच्या वारसाला किंवा त्याला त्याच्या खात्यामधील पूर्ण रक्कम देण्यात येईल. ६० वर्षांनंतरच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्या व्यक्तीच्या सहचारिणीला (किंवा सहचाऱ्याला) दरमहा पेन्शनची रक्कम मिळेल आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये वारसाला पूर्ण रक्कम मिळेल. ह्या पेन्शनच्या खात्यामध्ये जमा करावयाची रक्कम वेळेवर भरण्यात आली नाही तर १०० रुपयांच्या अंशदानावार प्रति महिना १ रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या योजनेमध्ये खाते सुरू केल्यानंतर पैसे भरणे बंद केले तरीही खाते सुरूच राहणार आहे. जर खाते बंद केले तर सरकारकडून भरण्यात येणारी रक्कम शून्य होणार आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एनपीएसच्या स्वावलंबन योजनेत पैसे गुंतविले आहेत, ती सर्व खाती ह्या योजनेमध्ये वर्गीत करण्यात येतील. ज्यांना हा बदल नको आहे त्यांना त्यानुसार निर्णय घेण्याची मुभा आहे. अनेक सुशिक्षित तरुण माझ्याकडे या योजनेबाबत विचरणा करीत असतात. अशा तरुणांसाठी विश्लेषण परताव्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही योजना भाववाढीवर मात करू शकणार नाही. ४० वर्षांच्या व्यक्तीने दरमहा १४५४ रुपयांची गुंतवणूक केल्यावर ६० या वर्षानंतर त्याला मिळणाऱ्या ५ हजार रुपयांच्या पेन्शनचा (त्याच्या शंभरीपर्यंत) परताव्याचा दर काढला तर तो होतो द.सा.द.शे. सरासरी ७.७४ टक्के आणि २५ वर्षांच्या व्यक्तीने पुढील ३५ वर्षे मासिक ३७६ रु.चा भरणा केल्यावर त्याला मिळणाऱ्या मासिक ५ हजार रुपयांच्या पेन्शनच्या बाबतीत परताव्याचा दर होता द.सा.द.शे. सरासरी ७.९ टक्के. ह्यामध्ये त्याच्या वारसाला मिळणारी एकगठ्ठा रक्कमही समाविष्ट करण्यात आलेली आहे.सर्वसाधारण व्यक्तीच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांबाबत तिला लागू पडणारा आजचा भाववाढीचा दर आहे, द.सा.द.शे. सुमारे १० टक्के. त्या हिशोबाने २५ वर्षांच्या व्यक्तीला ३५ वर्षांनंतर मिळणाऱ्या मासिक ५००० रुपयांची
आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापन केल्यापासून जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना अशा अनेक नवीन योजना सुरू केल्या. उद्देश एकच. जास्तीत जास्त जनता बँकिंग क्षेत्राशी संलग्न झाल्यावर त्यांच्यासाठी जे आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचविणे सुलभ होईल आणि खात्रीलायकरीत्या ते त्यांनाच मिळेल.
पेन्शनची अपेक्षित रक्कम वय १००० २००० ३००० ४००० ५००० पेन्शनसाठी मासिक अंशदान (रु)१८ ४२ ८४ १२५ १६८ २१०२० ५० १०० १५० १९८ २४८२५ ७६ १५१ २२६ ३०१ ३७६३० ११६ २३१ ३४७ ४६२ ५७७३५ १८१ ३८२ ५४३ ७२२ ९०२४० २९१ ५८२ ८७३ ११६४ १४५४

Post a Comment

 
Top