Add

Add

0
           महासत्ता होताना   गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज : - डॉ.शां ब मुजुमदार
पुणे:-‘ समाजातील सर्व काळजी करण्यासारख्या घटनांचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आहे,तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल ह्या जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेतर्फे मुलींच्या शिक्षणासंदर्भात प्रकल्प हातात घ्यावेत ’ असे प्रतिपादन सिंबॉयोसिस विश्‍व विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ.शा ब मुजुमदार यांनी रविवारी केले.
‘लायन्स क्लब 323 -डी 2’ च्या वतीने आयोजित ‘आगाज- एक नई शुरूवात’या कार्यक्रमातंर्गत सिम्बायोसिस महाविद्यालयाचे संस्थापक संचालक,कुलपती पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार यांना‘लायन्स एक्सलन्स पुर स्कार’ देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात लायन्सच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
ते म्हणाले,‘माझ्या रुपाने एका शिक्षकाचा गौरव लायन्स क्लब करीत आहे.म्हणून शिक्षण क्षेत्राच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.समाजातील चांगल्या बदलासाठी शिक्षण हेच महत्वाचे माध्यम आहे.ज्या चिंताजनक घटना समाजात घडत आहेत त्याचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आह त्यातून देश संपन्नतेकडे आणि समृध्दीकडे जाईल.लायन्स क्लबने त्यात योगदान म्हणून मुलींच्या शिक्षणासाठीचे प्रकल्प हाती घ्यावेत 
 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना ,विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम शैलेश शहा आणि डॉ.सतीश देसाई यांनी  यावेळी जाहीर केला.उस्थ्थितांनी लगेच या प्रकल्पासाठी देणग्या जाहीर केल्या.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जगातील 210 देशात विविध उपक्रम सादर केले जाणार आहेत. पुणे, अहमदनगर, नाशिक याभागात पसरलेल्या प्रांत 323 डी-2चे प्रांतपाल लायन श्रीकांत सोनी यांच्या मार्गद र्शनानुसार पदग्रहण समारंभ पार पडला हा सोहळा रविवार दि. 23ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंग मंदिराच्या सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत झाला यावेळी  डॉ.सतीश बत्रा,प्रांतपाल श्रीकांत सोनी, नरेश अगर वाल, नरेंद्र भंडारी,प्रेमचंद बाफना ,डॉ. विक्रांत जाधव,गिरीश मालपाणी,सरला सोनी होते.द्वारका जालान यांनी सूत्रसंचालन केले

Post a Comment

 
Top