Add

Add

0
ईरा सिंघल, रेणू राज आणि निधी गुप्ता या टॉपर्सची संवाद साधण्याची संधी

पुणे:- माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट(मिटसॉग)आणि माईर्स एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एम आयटीसीएसटी)यांच्यातर्ङ्गे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएस सी) स्पर्धा परीक्षा २०१४ मधील यशस्वीतांच्या सातव्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.देशातून पहिली आलेली ईरा सिंघल, दुसरी रेणू राज आणि तिसरी आलेल्या निधी गुप्ता यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना या टॉपर्सशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. येत्या बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) सकाळी ११.१५ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे हा सोहळा होत आहे. एमआयटी शिक्षणसंस्था समूहातर्फे आयोजित अशा आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे यंदा सातवे वर्ष आहे. भारताचे माजी निवडणूक आयुक्त श्री. एन. गोपालस्वामी, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, राज्यसभा खासदार तरुण विजय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.
प्रशासनामध्ये काम करताना अनेक प्रलोभने सामोरी येतात, त्यांना बळी न पडता देशापुढे चांगल्या कारभाराचा  आदर्श ठेवावा, चांगले प्रशासन कसे असते, हे या स्नातकांना समजावे; त्यासाठी या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा आणि त्यांच्यावर जनहिताचे चांगले संस्कार व्हावेत, हा या कार्यक्रमापाठीमागचा हेतू आहे.महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,पंजाब, चंडीगड,आंध्र प्रदेश,कर्नाटक,तमिळनाडू,केरळ,ओरिसा,बिहार,पश्‍चिम बंगाल,आसाम,हिमाचल प्रदेश,जम्मू-काश्मीर,दिल्ली,छत्तीसगड,हरियाना,सिक्कीम,नागालँड आदीभारताच्या सर्व राज्यातील आयए एस,आयपीएस,आयआरएस व इतर केंद्रीय सेवेमधील यशस्वी झालेल्या ११० विद्यार्थ्यांची या समारंभास हजर राहण्यासाठी मान्यता आलेली आहे. या सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेचा भाग होणार आहेत.प्रशासकीय सेवा विधीमंडळाने पारित केलेले कायदे,योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणी मध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
एमआयटी शिक्षणसंस्था समूह शैक्षणिक,आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलचनव्हे;  तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली. 

Post a Comment

 
Top