Add

Add

0
सामाजिक कार्यकर्त्या शोभनाताई रानडे यांचे प्रतिपादन; ‘ऋणानुबंध’ अंकाचे प्रकाशन
पुणे:- ‘‘आजच्या पुढारत चाललेल्या परिस्थितीत माणसाने माणसाशी नाते जोडण्याची गरज आहे. तरु णांनी स्वत:चा मार्ग निवडून प्रगती करीत असतानाच देशकार्यात सहभाग घ्यायला हवा,’’ असे प्रतिपादन गांधीवादी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शोभनाताई रानडे यांनी केले.
विद्यार्थी सहायक समितीच्या हीरक महोत्सवी वर्षानि मित्त समितीच्या उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांप्रती भावनात्मक चित्रण असलेल्या ‘ऋणानुबंध’ या विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि विश्‍वस्त शांताताई मालेगावकर,कार्यकारी विश्‍वस्त प्रभाकर पाटील व ऋणानुबंधच्या संयोजिका वसुधाताई परांजपे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
रानडे म्हणाल्या, ‘‘आसाममध्ये आम्ही मैत्रीचे नाते निर्माण केले.सगळ्यांनी एकत्र राहून प्रेमाचे नाते जोडायला हवे, हा विनोबा भावे यांचा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत राहिलो.त्यातून अनेक माणसे जोडली गेली व आपापसांतील दुरावा नाहीसा होऊन बंधुभावाची भावना निर्माण होत गेली.’’ 
समितीशी आपला घनिष्ट सबंध राहिला असल्याचे सांगून रानडे म्हणाल्या, ‘‘संस्थेसाठी मोलाचे योगदान देणारे अनेक कार्यकर्ते माझ्या परिचयाचे होते. त्यामुळे सुरुवातीपासून म्हणजेच १९५६ पासून समितीचाप्रवास मी पाहत व अनुभवत आले आहे. हरिभाऊ फाटक, अच्युतराव आपटे, सुमित्राताई केरकर, रावसाहेब पटवर्धन, चित्रा नाईक, शांताताई यांच्याशी माझे अगदी जवळचे नाते होते.त्यामुळे नियमित येणेजाणे होत असे. हरिभाऊ तर मला पित्यासमान होते. त्यांनी मला प्रेमकरायला शिकवले व माझ्यातील नेतृत्वगुणही वाढवले.’’
वसुधा परांजपे म्हणाल्या, ‘‘कार्यकर्ते हा समितीच्या कार्याचा कणा आहे. या कार्यकर्त्यांपैकी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भूमिकेतून संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांनी केलेल्या ऋणानुबंध या अंकात भर घालून हा प्रकाशित केला आहे.’’या प्रसंगी समितीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थी,माजी विद्यार्थी, कार्यकर्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. माजी विद्यार्थी तुषार रंजनकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकर्ते प्रभाकर वाल्हेकर यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top