Add

Add

0
Faisal Khan To Make His Marathi Debutअभिनेता आणि डान्सर फैजल खान सध्या झलक दिखलाजा मध्ये दिसून येत असून त्याने आपला पहिला चित्रपट प्रेम कहानीसाठी चित्रीकरण पूर्ण केले आहे. आमच्या सुत्रांनुसार, "महाराणामधील फैजलच ट्रॅक गेल्या वर्षी संपला. शोनंतर, फैजल आपल्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यात व्यस्त होता आणि त्याचसोबत आपला पहिला मराठी चित्रपट प्रेम कहानीसाठी चित्रीकरणही करत होता. पुनर्जन्मावर आधारित ह्या चित्रपटामध्ये फैजल नायक बैजूची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी फैजलच्या डान्सिंग कौशल्याचा फायदा उठवण्यासाठी चित्रपटात काही डान्स सीक्वेन्सचाही समावेश केला आहे."
आपल्या ह्या पदार्पणाबाबत फैजल अतिशय उत्साहात असून तो म्हणाला, "मी हा चित्रपट एक आव्हान म्हणून स्वीकरला. एक अभिनेता म्हणून ह्या चित्रपटात माझ्यासाठी अभिनय, अ‍ॅक्शन आणि डान्सच्या रूपात परफेक्ट मसाला आहे. ही भूमिका प्रदर्शनावर आधारीत आहे आणि मला नेहमीच अशाच भूमिका करण्याची इच्छा होती. माझ्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण हा माझ्यासाठी अतिशय उत्तम अनुभव आहे. आता लवकरच माझा पहिला हिंदी चित्रपट येईल अशी मी आशा करतॊ.

Post a Comment

 
Top