Add

Add

0
सोलापूर:-कॅन्सर हा रोग प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास तो बरा होतो.लोकांमध्ये कॅन्सर विषयक अनेक गैरसमज आहेत.हे गैरसमज दूर करून,कॅन्सर तज्ञांनी याविषयी मोठ्याप्रमा णावर जनजागृती करावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केली.
    इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सोलापूर शाखेला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला.याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी माजी सचिव डॉ.बी.एस.बिराजदार यांनी यासोसायटीच्या कार्याबद्दल माहितीविषद केली.श्री. मुंढे पुढे म्हणाले की,या सोसायटी मार्फत रूग्णांसाठी काय करता येईल याची स्पष्ट रूपरेषा आखण्यात यावी जेणेकरून रूग्णांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील.यावेळी त्यांनी उपस्थित सदस्यांशीही चर्चा केली तसेच  कॅन्सर रूग्णांची व हॉस्पिटलची पाहाणी केली.
    यासोसायटीचे कॅन्सर जागृती विषयक कार्यक्षेत्र विस्तारीत व्हावे यासाठी निवृत्त वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे योगदान घेवून त्यांना टाटा हॉस्पिटल या ठिकाणी प्रशिक्षित करून त्यांच्या अनुभवाचा फायदा या सोसायटीला मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी सूचना कॅन्सर तज्ञ डॉ. विजय शिवपुजे यांनी केली.

  याप्रसंगी सोसायटीच्या नुतन सचिवा डॉ. सरिता कोठाडीया व मावळते सचिव डॉ.बी.एस.बिराजदार यांचा  पुष्पगुच्छ व शाल देवून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सकडॉ.मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी,डॉ.शेखर चिडगूपकर,डॉ.सुशैला पाटील,डॉ.अ.कदीर पटवेगर, डॉ.टी.एल.मुदलीयार यांच्यासह इतर संबंधित डॉक्टर,संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

Post a Comment

 
Top