Add

Add

0
http://aplapune.com/admin/image/demo/6156__MG_4300.jpgतिने आपल्या साहाय्यक व्यक्तिरेखांमधूनही आपली छाप पाडली आहे. तिचे सौंदर्य आणि अदेने ती कुठल्याही फ्रेममध्ये असली तरी स्टारच असते. आता झीटीव्हीवरील प्रेमाची क्लासिक गाथा एक था राजा एक थी रानीमध्ये ती गायत्री  नायिकेची भूमिका करणार आहे. या मालि केत 1940च्या दशकातील स्वतंत्रतापूर्व काळातील प्रणय रंगवण्यात आला आहे.यानिमित्त तिच्याशी मारलेल्या या गप्पा
प्र. तुझ्या बद्दल थोडक्यात माहिती सांग आणि तू अभिनय क्षेत्राकडे कशाप्रकारे वळलीस?
मी मनोरंजनाच्या क्षेत्रातील नाही. माझ्या घरातील कोणीच अभिनयक्षेत्रामध्ये नाही. मी एका गुजराती परिवारातील असून माझ्या घरचे जुन्या विचारांचे नाहीत पण सुरक्षित वातावरण राखणारे आहेत. त्यामुळे सुरूवातीला जेव्हा त्यांना माझ्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाबद्दल समजलं तेव्हा त्यांचा थोडा विरोध होता पण आता त्यांना माझा अभिमान आहे.
प्र. एक था राजा एक थी रानी सोबत पुनरागमन करायचा विचार तू कसा काय केलास?
कुठलाही कलाकार या मालिकेतील भूमिका नाकारू शकणारच नाही. मी करतेय म्हणून नाही पण तेच खरं आहे. एक था राजा... ही मालिका नेहमीच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. स्वतंत्रतापूर्व काळावर आधारलेले अन्य कुठलेच शो नाहीत. भारतीय राजघराण्यांच्या शाहीजीवनशैली, गुप्तहेतू, असुरक्षिततेच्या भावना आणि काही न उलगडलेली रहस्ये असं सगळं काही यात आहे. ही संकल्पना आणि आमच्या चित्रीकरणाची ठिकाणे, सेट, कपडे या सगळयाबद्दल ऐकूनच मी खूप उत्साहात होते.
प्र.एखादा शो घेण्याआधी ब्रेक घेणे गरजेचे असते असे अनेक टेलिव्हिजन सेलेब्रिटीज्ना वाटते, तुलाही असे वाटते का?
होय.दैनंदिन मालिकांमुळे पूर्णपणे अडकायला होते आणि एका मर्यादेनंतर तुम्ही कंटाळता. त्यामुळे ब्रेक घेतल्याने चांगले वाटते. तुम्ही ताजेतवाने बनता आणि पूर्ण उत्साहाने कामाकडे वळता. त्यामुळे ब्रेक महत्त्वाचा आहे.
प्र. टेलिव्हिजनच्या कलाकारांचे ही खूप चाहते असतात. तुला कधी या पब्लिकअटेंशनचा त्रास झाला आहे का?
नाही. माझे चाहते माझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि मला तक्रारीला जागाच नाही.
प्र. तूला करायची आहे अशी एखादी भूमिका किंवा अन्य काहीही...
सध्या तरी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल मी समाधानी आहे. माझी राजेशाही अशी पहिलीच भूमिका आहे. याहून अधिक काय मागू शकले असते...
प्र. भविष्याच्या योजना?
आत्ता तरी काहीच नाही. सध्या फक्त एक था राजा एक थी रानी मधील माझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे.
प्र. सिद्धांत कर्णिक सोबत चित्रीकरणाचा अनुभव कसा आहे? या शोसाठी तू काही खास तयारी केलीस का?
तो खूपच चांगला आहे. त्याच्यासोबत काम करताना छान वाटतं. आम्ही भाषा, केसांची रचना, मेकअप आणि साडया अशा काही बाबतीत काळजी घेत आहोत.
प्र. हे सगळं तूला सर्गिकपणे जमतंय का?
नाही. मला बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. यापैकी मी काहीच या आधी केलं नाहीये. मला एक वेगळी 'मी' साकारावी लागत आहे.
प्र. आत्तापर्यंत तुझ्यासमोर आलेले एखादे आव्हान किंवा कठीण गोष्ट?
कठीन नाही, मला खरंतर मजा येत आहे. देशस्वतंत्र होण्याआधीची कथा असल्यामुळे भाषा थोडी वेगळी आहे. माझी व्यक्तिरेखा एका 24 वर्षीय मुलीची आहे त्यामुळे ती साकारण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे.


Post a Comment

 
Top