Add

Add

0
https://www.pcbtoday.in/uploads/Website/PuneNews_Registration/DSK1.jpg
पुणे- पुण्यातील पहिली भव्य टाऊन शिप म्हणून ओळखल्या जाणार्‍या डीएसके विश्वच्या  मेघम ल्हार या प्रकल्पाच्या फेज -२ मधील सदनिकाधारकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी गृहप्रकल्प निर्मितीत सहकार्य लाभलेल्या तसेच मेघमल्हार येथील सर्व सदनिका धारकांचा सत्कार तुळशीचे रोप आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला.सोबतच‘मल्हार धून’या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी  डी. एस. के समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, ब्रिगेडियर शर्मा, भाग्यश्री कुलकर्णी, अमित कुलकर्णी व प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले आदी उपस्थित होते.
६००० उंबऱ्याचे मॉडर्न गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डीएसके विश्व मधील ‘मेघमल्हार या प्रकल्पाच्या फेज २’ बद्दल अधिक माहिती देताना हेमंती कुलकर्णी म्हणाल्या,सिंहगड रस्ता परिसरातील निसर्गाच्या सानि ध्यात असणारा,सुप्रसिद्ध आर्किटेक हाफिज कॉट्रॅक्टर यांच्या डिझाईन मधून साकारलेला हा दर्जेदार गृहप्रकल्प आहे. सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा ह्या प्रकल्पामध्ये खास स्पॅनिश वास्तुशैलीचा उपयोग करून घरांची रचना करण्यात आली आहे. 
सव्वा लाख स्क्वेअर फुटाचे पोडीयम गार्डन,लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त आणि ऐसपैस जागा, कम्युनिटी हॉल,जिमनेशियम, कार्यक्रम अथवा समारंभासाठी प्रशस्त पार्टी लॉन यांसारख्या सुखसोयी खास ग्राहकांसाठी आम्ही येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय एका उत्तम गृहप्रकल्पासाठी लागणार्‍या स्केटिंग रिंग,  बास्केट बॉल कोर्ट, सिटीझन प्लाझा, हर्बल गार्डन आदि अत्याधुनिक सुखसोयी देखील येथे आहेत. १, २ व ३ बी एच के आणि रो हाउसेस या प्रकल्पात आहेत. 
रोजच्या जगण्यासाठी जे काही लागते ते सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे या हेतूने आम्ही डीएसके विश्व या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य टाऊनशिपची उभारणी केली असल्याची भावनाही  त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. 

Post a Comment

 
Top