Add

Add

0

खडकवासला - पुण्यात शनिवारपासून हलक्‍या पावसाला सुरवात झाल्याने 26 हजार पुणेकरांनी सिंहगड सर करण्यासाठी आपला मोर्चा वळविला. त्यामुळे सिंहगड पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.या दोन दिवसांत वन खात्याकडे एक लाख 59 हजार रुपये उपद्रव शुल्क जमा झाले. त्यापैकी रविवारी (ता.26) एका दिवसात 97 हजार 510 रुपये जमा झाले आहेत. 
सिंहगडाच्या दऱ्या- खोऱ्यात खाली उतरणारे ढग... झोंबणारा गार वारा... आणि गडावर मिळणारी कांदाभजी, बेसन भाकरी याचा आस्वाद घेण्यासाठी सिंहगडावर पर्यटकांनी गर्दी केली होती. 
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पर्यटक सिंहगडावर येत असतात. वनविभागाकडे चार वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात 84 हजार रुपये उपद्रव शुल्क जमा झाले होते. जून महिन्यातच विक्रमी रक्कम जमा झाल्याने यंदा पर्यटकांची गर्दी होईल, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. 
सिंहगडावर रविवारी 666 चार चाकी वाहनांमधून चार हजार, तीन हजार 173 दुचाकीने सहा हजार, खासगी प्रवा सी जीपने चार हजार आणि पायी दीड हजार असे 15 हजार पर्यटक गडावर आले होते. शनिवारी 543 चारचाकी वाहनाने सव्वातीन हजार, एक हजार 660 दुचाकीने पाऊणेचार हजार, खासगी जीपने तीन हजार आणि पायी एक हजार असे 11 हजार पर्यटक आले होते. 

प्प्याटप्प्याने सोडली वाहतूक 

उपद्रव शुल्क नाका, वाघोबाची दरी (कोंढणपूर फाटा) व गडावरील वाहनतळ असे तीन टप्पे केले होते. गडावर गर्दी झाल्यानंतर पायथ्यापासून वाघोबाच्या दरीपर्यंत ठराविक पर्यटकांना सोडले जात होते. त्यानंतर, परत येणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार गडावर वाहने सोडली जाई.

Post a Comment

 
Top