Add

Add

0
  पुणे(प्रतिनिधी):- गुंजवणी धरणाचे सांडव्याचे बांधकाम शीर्ष पातळीपर्यंत पूर्ण झाले असल्याने (719.20 मी तलांक) येत्या पावसाळयात 719.20 मी. तलांकापर्यंत पाणी फुगवटा होऊन, पुर पातळी 719.20 मी. ते 727.20 मी. या दरम्यान होण्याची शक्यता आहे. यामुळे कानंदमधील कोदापूर व भोसलेवस्ती येथील 104 घरे, निवी येथील खालच्या पातळीवरील 2 घरे व वागदरा येथील 4 घरे पाण्याखाली जाणार आहेत. पाण्याखाली येणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे इच्छीत स्थळी स्थलांतर यापूर्वीच करण्यात आले आहे. तरी या गावात कोणीही वस्तीस राहु नये.

        येत्या पावसाळयात कानंद (कोदापूर व भोसलेवस्ती), चापेट,धानेप,निवी, भट्टी वागदरा, अंत्रोली,गेव्हंडे,बोपलधर, विहीर, कोंढावळे (बु.) या गावातील शेतजमिन 719.20 मी. तलांकापर्यंत बुडीताखाली येणार आहेत. तसेच 719.20 मी. ते 727.20 मी. मधील जमिनी पुराच्या पाण्याखाली येतील. त्यामुळे या शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारची मशागत अथवा पेरणी करु नये. तसेच या शेतजमिनीचा बुडीतामुळे नुकसान होईल अशा प्रकारे कोणताही उपयोग करु नये. अधीक माहितीसाठी कार्यकारी अभियंता, निरा देवघर प्रकल्प विभाग,सांगवी (भाटघर)  यांचे कार्यालयाशी  संपर्क साधण्यात यावा असे बापुसाहेब पवार,कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

 
Top