Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- कंपन्‍यांचा सीएसआर विभाग,स्‍वयंसेवी संस्‍था यांनी ग्रामीणभागात कामे करताना शेतकरी, ग्रामस्‍थ यांच्‍या गरजेनुसार काम केले तरच सामाजिक काम केल्‍याचे समाधान लाभेल.अन्‍यथा ते कागद रंगवण्‍याचे काम होते.
स्‍वयंसेवी संस्‍था,मोठ-मोठया कंपन्‍या त्‍यांच्‍या सीएसआर निधीतून जिल्‍हयाच्‍या विविध भागात उपक्रम राबवताना दिसतात. परंतू त्‍यांच्‍या या उपक्रमांना स्‍थानिक गरजांच्‍या जाणिवेची जोड आवश्‍यक आहे.याबाबत उदाहरण म्‍हणून पाहिले तर, आम च्‍या मुळशी धरण परिसरात टाटा पॉवर कम्‍युनिटी डेव्‍हलपमेंट ट्रस्‍टच्‍या वतीने फळ झाडे,भाताच्‍या 'जया' बियाण्‍याचे नुकतेच वाटप झाले.त्‍याबददल त्‍यांचे अभिनंदनच. ते त्‍यांचे कर्तव्‍य देखील आहे. परंतू इथे शेतक-यांची इंद्रायणी सारख्‍या बियाण्‍याची मागणी होती. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 
कंपनीने शेतकरी, ग्रामस्‍थ यांच्‍या भौतिक गरजांचा विचार करून योजना राबवल्‍या पाहिजेत. शेतक-यांचे विचार, मागणी लक्षात घ्‍यायला हवी. मुळशी धरण भागात भातशेती हे प्रमुख पीक आहे. त्‍यावरच अनेकांची वर्षभराची उपजिवीका अवलंबून आहे. 'इंद्रायणी','आंबेमोहोर','५७','फुले समृध्‍दी' या भाताच्‍या वाणांकडे शेतक-यांचा ओढा आहे. यापेक्षा वेगळे बियाणे वापरण्‍याचा प्रयोग करण्‍यास शेतकरी धजत नाहीत. नुकसान झाल्‍यास ते सहन करण्‍याची अनेकांची परिस्थिती नाही. बियाणेसुध्‍दा १५ मे च्‍या आत मिळाले तर त्‍याचा उपयोग होतो. त्‍यानंतर वाटप केल्‍यास उशीर झालेला असतो. अनेकांनी बियाणे खरेदी करून पेरणीसाठी तयार ठेवलेले असते. 
पावसाळा म्‍हणजेच भातशेतीचा हंगाम संपल्‍यानंतर मुळशी धरण भागामध्‍ये पाण्‍याची मोठी अडचण निर्माण होते. पाणी असणारे शेतकरी गहु, बटाटा, घेवडा,भाजीपाला अशी पिके घेतात. तर कमी पाणी असणारे हरभरा, वाटाणा, मसूर अशी पिके निवडतात. हवे असेलेले बियाणे मिळाले तर शेतक-याचे दोन रुपयेही वाचतील. 
झाडे, बियाणे वाटप सोपे आहे. परंतू त्‍यांना जगवण्‍याचे सगळयात अवघडकाम शेतक-यालाच करावे लागते. त्‍यासाठी पाण्‍याचीही सोय व्‍हावी.'कोणत्‍याही कंपनीने भुकेलेल्‍या अन्‍न, तहानलेल्‍याला पाणी अशी भुमिका ठेवली पाहिजे.शेतकरी, ग्रामस्‍थांच्‍या गरजेनुसार सीएसआर विभाग, स्‍वयंसेवी संस्‍थांनी काम केले, तरच त्‍यांचा निधी सार्थकी लागेल.' - अॅड.प्रशांत जोरी, माजी उपसरपंच संभवे, ता.मुळशी

Post a Comment

 
Top