Add

Add

0

       अध्यक्षपदी हनुमंत सुर्वे तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब मरगळे 


पौड (प्रतिनिधी):- गावांचा विकास व्‍हावा. शासकीय, सीएसआर, निधी मिळावा. शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोचवावा. विकासकामे मार्गी लागावीत. यासाठी मुळशी तालुक्‍यातील सरपंचांनी एकत्र येत 'सरपंच महापरिषदे'ची स्‍थापना केली. अध्‍यक्षस्‍थानी जामगावचे आदर्श सरपंच हनुमंत सुर्वे; तर कार्याध्‍यक्ष पदी वेगरेचे आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांची निवड करण्‍यात आली.

मुळशी तालुक्‍याचा विस्‍तार खुप मोठा आहे. एक टोक पुणे शहराचे दार ते थेट कोकणाची हदद. हिंजवडीतील आयटी उद्योग, पिरंगुट एमआयडीसीतील कंपन्‍या, मुळशी धरण. पुर्व पटटयात झगमगाट तर पश्चिम पटटयात हलाखीची स्थिती. यामुळे अनेक ठिकाणी विकासाचे विषम चित्र दिसते. केंद्र शासन, राज्‍य शासन, जिल्‍हा परिषद,पंचायत समिती यांच्‍या विविध योजनांचा लाभ ग्रामस्‍थांपर्यंत पोचवणे. आवश्‍यक कागदपत्रांची जुळ वणी, कामांचा पाठपुरावा करणे. विकासकामांसाठी निधी मिळवणे. यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्‍याशी समन्‍वय ठेवत विकासाचा अनुशेष भरून काढणे. गावगाडा हाकताना करावी लागणारी तारेची कसरत. हे गावच्‍या सरपंचाचे मोठे कौशल्‍य. 

गावच्‍या समाजकारणात युवक, युवतींचा सहभाग वाढतो आहे. अनुभवी सरपंचांचे इतरांना मार्गदर्शन मिळावे. विकासाचे प्रश्‍न मार्गी लागण्‍यासाठी तालुका पातळीवर सरपंचांची संघटना किंवा सरपंच परिषद असावी अशी सर्वांची इच्‍छा होती. यासाठी तालुक्‍यातील सरपंच एकत्र आले. 'सरपंच महापरिषदेची स्‍थापन करण्‍यात आली. प्रत्‍येक पंचायत समिती गणातून चार सरपंचांची निवड करून त्‍यातून कार्यकारिणी तयार करण्‍यात आली. 
उर्वरित सर्व सदस्‍यांना सदस्‍य करुन घेण्‍यात आले. लवकरच सरपंच परिषदेची शासनाकडे नोंदणी करण्‍यात येणार आहे.
'तालुक्‍यात माण, हिंजवडी, पिरंगुट, घोटावडे, भरे आदी परिसरामध्‍ये मध्‍ये मोठया प्रमाणात कंपन्‍या आहेत. 
अनेक कंपन्‍या सीएसआर निधी तालुक्‍याबाहेर खर्च करतात. या कंपन्‍यांचा सीएसआर निधी तालुक्‍यातीलच 
दुर्गम गावांना मिळावा. ग्रामस्‍थांचे विविधप्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी सरपंच परिषदेच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करणार,' असे सुर्वे, मरगळे यांनी सांगितले.  
मुळशी तालुका सरपंच महापरिषद कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष - हनुमंत सुर्वे (जामगाव), कार्याध्यक्ष - भाऊ मरगळे (वेगरे), 
उपाध्यक्ष- बाळासाहेब शेडगे (भुगाव),स्वाती येनपुरे(वातुंडे),प्रवीण साठे(साठेसाई),शशीकांत चव्हाण (अकोले), प्रशांत रानवडे (नांदे), प्राची बुचडे  (मारुंजी), 
सरचिटणीस-अरुणा वीर (मांदेडे),वैशाली सातव (लवळे),मोहन शिंदे (कासारआंबोली),अनिता शिंदे(रिहे), ऋतुजा साठे (भालगुडी), सल्लागार-ज्ञानेश्वर पवळे (पिरंगुट),  
कार्यकारिणी सदस्य ः- पांडुरंग ओझरकर (माण), ललिता पवळे (पिरंगुट), वैशाली मारणे (उरावडे),कविता दूडे (कोळवण), योगेश टेमघरे (काशिग),आनंद लाटे (कासारसाई), अंकुश गायकवाड (जांबे), सुरेखा दिघे (भांबर्डे), रवींद्र सोंडकर (वळणे) यांची निवड करण्‍यात आली.

Post a Comment

 
Top