Add

Add

0
गणवेश’....या नव्या भूमिकेने ाझ्यातल्या कलाकाराला,माणसाला अधिक समृद्ध केलेय.एका गणवेशासाठी सामान्य माणसाला किती स्ट्रगल करावा लागतो...हेछोटय़ा छोटय़ा गोष्टीतून मांडत अतूल जगदाळेने फुलवलेली ही चित्रकथा आजच्या सामाजिक गोंधळावर भाष्य करणारी असून प्रत्येकाच्या मनाला भिडणारी आहे.आपल्या नव्या भूमिकेत अजुनही गुंतून असणाऱया किशोर दम यांची ही बोलकी प्रतिक्रिया.
येत्या 24जूनला ‘गणवेशप्रदर्शित होतोय.त्यानिमित्ताने चित्रपटात विटभट्टी मजूराची भूमिका करणा ऱया किशोर कदम यांनी चित्रपटाचे वेगळेपण मांडतानादिग्दर्शक अतूल जगदाळे यांच्या या पहिल्याच प्रयत्नाचे अगदी तोंडभरून कौतुक केले.
गणवेशबद्दल
हा चित्रपट वेगळ्याच पठडीतला असून सामाजिक दंभावर प्रहार करणारा आहे.समाजातल्या सामान्यापासून अगदी दिग्गज डॉक्टरांपर्यंत सर्वांनाच त्याचा प्रत्येकाचागणवेश’ असतो.थोडक्यात आपला समा गणवेशांचा बनला आहे.त्या प्रत्येक गणवेशाला त्याचं त्याचं असं स्वतंत्र अस्तित्व असते,स्व तंत्र कर्तव्य असते आणिजबाबदारीही असतेपण ती जबाबदारी पार पाडली जात आहे काआजच्या या एकूण परिस्थितीवर भाष्य करणारी ही चित्रकथा आहे.
आपली भूमिका... 
एक साधा वीटभट्टीवरला मजूरत्याच्या मुलाला शाळा शिकवतोयत्या मुलाला गणवेश घेऊन देण्यासाठी त्याचे प्रयत्न अशी साधी कथा आहे ही.
वेगळेपण... 
माझी प्रत्येक भूमिका वेगळीच असते.किंबहुना ती भूमिका जगण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो. या वेळी देखिल मी वीटमजुरांमध्ये राहिलोत्यांची भाषा शिकलो,त्यांची देहबोली पाहिली,वागणंाहणंखाणं पिणंहे अनुभवलं...भूमिकेसाठी तब्बल चौदा किलो जन कमी केलेचित्रपटात काम करणाऱया मुलाबरोबर राहिलो.एकूणकाय तरजेवढा जिवंतपणाभूमिकेत आणत  येईल  तेवढा आणला आहेमी माझी भूमिका पार पाडली आहे.
भूमिका काय सांगते... 
स्वातंत्र्यानंतर आजही आपला समा अजुन तिथंच आहेआर्थिक स्तरावर मागासलेल्या वीटभट्टी मजुराला एका ‘गणवेशासाठी काय काय करावे लागते  अनत्यांच्यावर मग काय प्रसंग गुजरतात या छोटय़ा छोटय़ा घटनांमधून समाजातील वैगुण्यावर हसत हसत बोट ठेवतच हा चित्रपट रंगत जातो हे विशेष.
निर्मिती दरम्यान.. 
या चित्रपटांच शुटिंग आम्ही बऱयाच वेळा अकोल्यात लाईव्ह केलंय.त्यामुळे कुठे कुठे कॅमेरे लपवून मग अचानक रस्त्यावर आम्ही यायचोत्यामुळे कुणी ओळखलंकी तो मागे मागे यायचात्याला टाळायला लागायचंत्यातून अनेकवेळा गोंधळ व्हायचानवीनच चित्र तया व्हायचंयासारख्या अनेक गंमती घडल्याचित्रपटनिर्मिती दरम्यान.
बॉक्स
मी अधिक प्रगल्भ झालो!
भूमिकेने माझातल्या माणसालाकलाकाराला आणखी प्रगल्भ बनवलंसुरूवातीला मी होतोत्यात प्रत्येक भूमिकेगणिक आता आणखी बदल घडलायंअर्थात प्रत्येकचित्रपटागणिक हे घडतं जातयंजोगवाफॅण्ड्रीनटरंग पाठोपाठ ‘गणवेश’... प्रत्येक भूमिकेने नवं काही दिलंमुख्य म्हणजे मंला समृद्ध केलं.
दिग्दर्शक नवीन असताना....
होय..अतुलचा हा पहिलाच चित्रपट, पण त्याने जेव्हा मला कथा सांगितली तेव्हा कथा आणि चित्रपटनिर्मितीचे त्याची पॅशन मला भावलीकथा ऐकल्यावर वाटून गेलेकी मी या चित्रपटात असायलाच पाहिजेत्यानंतर अतुलचे डिरेक्शनही आवडलेमुळात कलाकाराला समजून घेऊन त्यानुसार काम करवून त्याची खासियत हीसगळ्यात वेगळी आहेत्याला जे हवंय ते त्यानं कलाकारांकडून काढून घेतलंयम्हणूनचं चित्रपट सुंदर सजलायकॅमेरा आणि इतर तांत्रिक अंगाकडेही त्याचं विशेषलक्ष होतंकिंबहुना कॅमेऱयाचं त्याचं ज्ञान अफलातून असल्याने चित्र उठावदार आणि मनाला भिडणारी झालीतमाझ्या वेगवेगळ्या भूमिका गाजल्यात त्या सगळ्यादिग्दर्शकांचा तो पहिलाच  चित्रपट होताहा एक योगायोग म्हणायला हरकत नाहीफॅण्ड्रीनटरंग नंतर आता गणवेश..गंमतीचा भाग हेअतुलचे दिग्दर्शनचांगलेच आहत्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.

Post a Comment

 
Top