Add

Add

0
माले(विशेष प्रतिनिधी):-मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पटटयाला निसर्गाचा वरदहस्‍त लाभलेला आहे. पाऊस, डोंगर, दरी, मुळशी जलाशय, वनराई, झाडे आदींनी संपन्‍न असलेला हा पटटा आहे.पावसाळयात होणारी निस र्गाची उधळण,हिरवाईने नटलेला परिसर यामुळे मोठया प्रमाणात पर्यटक या परिसरात येत असतात. निसर्गा च्‍या या उधळणीला नुकतीच सुरवात झाली असून भीज पावसामुळे परिसर हिरव्‍या रंगाने नटू लागला आहे.
मुळशीच्‍या पश्चिम पटटयात तशी जुनच्‍या पहिल्‍या आठवडयापासूनच पावसाची नांदी आहे. ताम्हिणी, निवे, पिंपरी, वांद्रे, डोंगरवाडी, आदरवाडी या परिसरात पावसाने अनेकदा हजेरी लावली. दिवसभरात अनेकदा पावसाचे वातावरण तयार होऊन भीज पाऊस अनुभवता येत आहे. दिवसागणिक पावसाचे प्रमाण वाढत आहे. क्षणोक्षणी रंग बदलणारा निसर्ग. ऊन, पाऊस, डोंगरावरून खाली उतरलेले ढग एकाचवेळी दिसत आहेत. पिंपरी, डोंगरवाडी, आदरवाडी येथे तर खाली उतरलेल्‍या ढगांमुळे अवघ्‍या काही फुटांवरचेही दिसत नाही. भरदुपारीही धुक्‍यात हरवता येत आहे. 

उन्‍हाळयाच्‍या झळा लागलेल्‍या, वणव्‍याने करपलेल्‍या डोंगरांवर भीज पावसाने जणु काही जादूची कांडी फिरवलीय. जिकडे-तिकडे हिरवे अंकुर उगवले आहेत. झाडा झुडपांना तजेली कांती आली आहे. सर्वत्र हिरवळीचा शालु पसरू लागला आहे. सोबत डोंगरमाथ्‍यांवरून ढग खाली जमिनीच्‍या भेटीला येऊन पसरणारे दाट धुके, भीज पाऊस, आल्‍हाददायक गारवा यामुळे वातावरण प्रसन्‍न होत आहे. मोरांचे मियांव....मियांव, कोकिळेचे कुहु...कुहु, पक्ष्‍यांचे गुंजन वन्‍यजीवांमध्‍ये चैतन्‍य पसरल्‍याचे सांगतेय.निसर्गाच्‍या या उधळणीमुळे परिसराचे रुपडे पालटत असून नव्‍या नवरीप्रमाणे नटू लागला आहे. 

Post a Comment

 
Top