Add

Add

0
लखनऊ (वृत्तसंस्था ):- मासिक पाळीच्या दिवसातील स्वच्छते संदर्भात नुकतेच युनिसेफतर्फे भारतात एक अभियान सुरू करण्यात आले. उत्तप्रदेशमधील लखनऊ येथून या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी युनिसेफची भारतातील ब्रँड अँबेसेडर आणि बॉलीवूडची अभिनेत्री करीना कपूर उपस्थित होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून करीनाने ’मासिक पाळी’ ही कशी सकारात्मक आहे या बद्दल विवेचन केले. 
करीना म्हणाली, ’सर्व महिलांना मासिक पाळी येते. खरेतर मासिक पाळी ही महिलांसाठी गर्वा
ची गोष्ट आहे. मात्र असे असून सुद्धा या विषयावर सार्वजनिक रुपात चर्चा करणे टाळले जाते. त्यामुळेच मासिक पाळीसंदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक ’नव निर्मितीची’ नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच आपण महिलांनी मासिक पाळी क्विषयी नेहमीच सकारात्मक असले पाहिजे.’
’स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दिवसात हा विषय सामाजिक चळवळीचा विषय झाला आहे. मात्र भारतासारख्या असंख्य पातळ्यावर विभागल्या गेलेल्या समाजाच्या एका स्तरावर ही क्रांती सुरू असतानाच अजूनही लाखो स्त्रियांना मासिक पाळी नकोशी वाटते, हे वास्तव नाकारता येत नाही.’ अशीही खंत करीनाने मांडली. 
’त्या’ दिवसात स्वच्छता खूपच गरजेची...
मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी  मे या दिवशी जागतिक पातळीवर ’युनिसेफ’मार्फत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखले जावे यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र स्त्रियांनी ’मासिक पाळी’कडे कोणतीही अडचण म्हणून न पाहता त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा हा या कार्यक्रमांचा उद्देश असतो.  
मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी स्वच्छता राखणे किती महत्वाचे आहे याविषयी स्पष्टीकरण देत करीना म्हणाली, ’ज्या दिवसात स्वच्छता सर्वात जास्त गरजेची असते, नेमके त्याच दिवसात स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष  करतात. मात्र हे दुर्लक्ष नंतर आजारात परावर्तित होऊन त्रासदायक ठरू शकते. केवळ अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक स्त्रियांना स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. मासिक पाळीसाठी आज बाजारपेठेत अनेक प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनस् उपलब्ध असली तरी केवळ ती वापरणे एवढेच स्वच्छतेसाठी पुरेसे नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही महिन्यातील हे चार दिवस खरे तर महत्त्वपूर्ण असतात. मात्र या दिवसात शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो व त्याचा साहजिक परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. अर्थातच जेव्हा स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे असते नेमके तेव्हाच त्याबद्दल उदासीनता बाळगली जाते. मात्र त्यामुळे जंतुसंसर्गापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना आमंत्रण मिळते.  त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखला येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.’

Post a Comment

 
Top