Add

Add

0
स्वप्न अनेकजण पहातात पण ती सत्यात उतरवि ण्याची धमक किती जणांमध्ये असते बरं?… कित्ये कांची स्वप्नं त्यांच्या  दैनंदिन धावपळीत विरून जातात, काहींना त्याची पूर्तता करता करता दमछाक होते तर काही स्वप्नांच्या अलीकडेच अडखळून पड तात ! पण अतुल जगदाळे या युवकाची पाऊले त्याही पलीकडची आहेत. मुंबई स्वप्ननगरीतल्या मायावी जगात सिनेमॅटोग्राफी हे तंत्र आत्मसात करून आपली वेगळी छाप सोडत त्यांने स्वप्नांच्याही पलीकडची वाटचाल सुरु केली. मायानगरीत दाखल होण्याचे पाहिलेले पहिले स्वप्न आणि ते साकारण्यासाठी केलेला संघर्ष. एका सा
मान्य शेतकऱ्याच्या मुलाची अचंबित करणारी ही गोष्ट. शेताच्या बांधावरून पडत - धडपडत वेग घेणारी त्याची पाऊले अचानक एका अक्शनला जमिनीवरून थेट आभाळात भराऱ्या घेत पुन्हा नव्या स्वप्न चाहुलीत गुंतू लागली. ही सगळी स्वप्ने पाहताना जमिनीची उंची आणि खोली याचं भान मात्र कायम होतं, त्यामुळे त्या स्वप्नांच्यापलीकडे जाण्यासाठी तयारी सुरु करताना आसपासचे निरीक्षण करण्याचे काम सुरु झाले. डीओपी म्हणून काम करताना आपल्याला करावी लागणारी तडजोड आणि असणारी बंधने जुगारून काहीतरी वेगळे, माझ्या भाषेत भन्नाट करायचे डोक्यात आले. चित्रपट काढण्याचं नक्की झालं मात्र त्यासाठी भरपूर पैसा हवा होता. त्याचे टेंशन नव्हते पण आपल्या मातीशी नाळ जुळवणारे काही तरी पिकवायचे होते. आणि त्यासाठी रिस्क घेण्याची तयारीही झाली होती. हळूहळू तयारी सुरु झाली आणि एक एक पायऱ्या पुढे सरकत एकाच चित्रपटात अतुलने अनेक स्वप्ने साकार करीत स्वतःलाच नव आव्हान देणारा "गणवेश" परिधान केला आहे . त्याच्या 'गणवेश'ने त्याला निर्माता, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक अश्या तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणले आहे. एका खेड्यातून आलेल्या ह्या मुलाच्या अथक परिश्रमांना मिळालेलं यश म्हणजे या मायानागरीने केलेला सलाम आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये. ह्या मायानगरीत परिश्रम आणि रिस्क पत्करणाऱ्याच्या श्रमाचे नेहमीच चीज झाले आहे. मुंबईतल्या हितचिंतक व मित्रपरिवाराच्या मदतीने विविध कठीण परिस्थितीवर मात करीत अंतिम ध्येयपूर्तीचे टॉंनिकरुपी बळ वाढत गेले. ग्रामीण शहरी विविध आशय -विषय असलेल्या चित्रकलाकृतींच्या छायाचित्रणाची जवाबदारी खांद्यावर घेऊन हा साताऱ्याचा रांगडागडी  सुसाट घौडदौड करीत स्पष्ट मनोरंजन घडविण्यासाठी कायम कटिबद्ध आहे, पण जे चाललंय त्यात तो स्वतः मात्र असमाधानी होता. त्यामुळे आपल्या मनातलं मनातच राहत होत, तरीही प्रत्येक कलाकृतीत आपली अतुलनीय छाप अतुलने सोडली आहेच…। 

Post a Comment

 
Top