Add

Add

0
                साप्ताहिक कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उपक्रमाचे उद्घाटन 

पुणे :-राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या १७ व्या वर्धापन दिनानिमित आयोजित 'वर्धापन दिन सप्ताह' विविध कार्यक्रम ,उपक्रमांनी साजरा करण्यात आला .ध्वजारोहण ,अवयव दान सभासद नोंदणी अभियान ,महात्मा गांधी यांच्या विचारांवरील व्याख्यान ,साप्ताहिक मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन,कार्यकर्त्यांसाठी आणि कुटुंबियां साठी विशेष नाट्य प्रयोग ,पक्षातील कार्यकर्त्यांचा वाढ दिवस ,सहल अशा अनेक उपक्रमांनी हा 'वर्धापन दिन सप्ताह ' साजरा करण्यात आला .  
  'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा'च्या १७ व्या वर्धापन  दिनानिमित्त पुणे शहर कार्यालयात (हिराबाग )येथे शुक्र वारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी माजी महापौर  उल्हास ढोले -पाटील यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले.
यावेळी  शहराध्यक्ष खासदार एड . वंदना चव्हाण , महापौर प्रशांत जगताप,अंकुश काकडे ,एड . म .वि . अकोलकर,रवींद्र माळवदकर, माजी आमदार कमल ढोले -पाटील,सभागृह नेते बंडू केमसे,मोहनसिंग राजपाल, अश्विनी कदम,कुमार गोसावी, शालिनी जगताप, राजलक्ष्मी भोसले,एड .भगवान साळुंखे,संगीता कुदळे  माजी महापौर, आमदार, विधानसभा अध्यक्ष ,पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना  माजी महापौर  उल्हास ढोले -पाटील म्हणाले ," आपल्या  पक्षाला संस्थापक  शरद पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी खूप कठीण परिस्थितीतून उभे केले आहे,. आता आपल्या  सर्वांवर पक्ष सांभाळण्याची जबाबदारी आहे. आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात मतभेद ठेवू नका . महिलांना बरोबर घेऊन काम करा . त्या आपल्या भगिनी आहेत. महिलांमध्ये कार्यक्षमता जास्त असते. त्या चांगले काम करतात . निवडणुकीला सामोरे जाताना सर्वांनी एकत्र येउन काम केले पहिजे. असा सल्लाहि  यावेळी त्यांनी दिला . " 
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,'पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट करून ,पालिकेत पुन्हा सत्ता आणून ,सर्व सामान्यांच्या हितासाठी कार्यरत पक्ष ही पक्षाची प्रतिमा दृढ केली जाणार आहे . हा पक्ष पुरोगामी ,प्रागतिक विचारांचा आहे ,समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा आहे आणि पुणे शहराला जगातील उत्तम शहर असा नाव लौकिक मिळवून देणारा आहे '
    पक्ष कार्यालयातील सहकारी अशोक जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते  केक कापण्यात आला . तसेच वर्धापन  दिनानिमित्त 'कार्यकर्ता मार्गदर्शन  शिबिरा' चे उद्घाटन शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या  हस्ते करण्यात आले. दर शनिवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्ता मार्गदर्शन  शिबिराचेआयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती शिबिराचे संयोजक शंकर शिंदे यांनी दिलि. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादलाचे अध्यक्ष कुमार तांबे यांनी केले. 
     ' राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा ' च्या वर्धापन  दिनानिमित्त ३ जुन २०१६ रोजी 'आई रिटायर होते' या नाटकाच्या प्रयोगाचे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते आणि कुटुंबियांसाठी आयोजन करण्यात आले होते.  
दिनांक ५ जुन रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या  वतीने पर्यावरण  रॅलीचे पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  आयोजन करण्यात आले होते .पर्यावरण दिनानिमित्त आणि वर्धापन  दिनानिमित्त आयोजित रॅलीमध्ये आठ विधान सभा मतदार संघ निहाय आकर्षक रॅली, आकर्षकदेखावे , नवीन संकल्पना, याविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील  विजेत्यांना अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .   या रॅलीमध्ये  कार्यकर्ते , नगरसेवक , माजी महापौर , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
तसेच ६ जुन रोजी  पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने वर्धापनदिना निमित्त  ज्येष्ठ पत्रकार अरुण  खोरे यांच्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी   ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला .  यावेळी नर्सेस फेडरेशन अध्यक्ष अनुराधा आठवले ,पोष्टल युनियन अध्यक्ष मनोहर गडकर ,कामगार कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांचा सत्कार खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाला . 
                   पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  ९ जुन रोजी अवयव दान सभासद मोहिमे अंतर्गत आठही मतदारसंघातून प्रत्येकि  ३५० फ़ॉर्म भरण्यात आले . या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन नितीन उर्फ बबलू जाधव यांनी केले होते. 

Post a Comment

 
Top