Add

Add

0

पौड(प्रदीप पाटील):- भाजपाच्या राज्य व केंद्र शासनाच्या निष्क्रियतेविरोधात मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीने मोर्च्याचे आयोजन केले होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पौड येथे कॉंग्रेस भवन ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा
काढून सरकारचा निषेध करणारे पत्र तहसीलदार प्रशांत ढगे यांना दिले. यामोर्च्यात कॉंग्रेस कमिटी, महिला आघाडी,युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते व तालु क्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्च्याचे नेतृत्वमुळशी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले. 
प्रास्ताविकमधुर दाभाडे यांनी केले. यावेळी बोलताना गंगाराम मातेरे म्हणाले की,केंद्र सरकार आपल्या कार्याची दोन वर्षे पूर्ण झाल्याचा एका बाजूला आनंदोत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला समाजातील सामान्य नागरिकांनाविविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सत्तेवर येण्यासाठी भाजपच्यानेत्यांनी अनेक खोटी आश्वासने दिली होती.परंतु त्यांना त्याचा विसर पडलाअसून त्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ पडलेला असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी हे सरकारजाहिरातबाजीवर कोटयावधी रुपये खर्च करीत आहे. हेच का यांचे ‘अच्छे दिन’अशी उपरोधिक टीकाही त्यांनी भाषणातून केली.यावेळी पांडुरंग राउत, संग्राममोहोळ, सुरेश पारखी,शिवाजीराव बुचडे , संजय उभे, रोहिदास केमसे  महिला
आघाडीच्या कांताबाई पांढरे , सविता कुंभार, तसेच दादाराम मांडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top