Add

Add

0
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीला ग्लॅमर मिळवून देणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा २५ जून हा  वाढदिवस असून ती 30 वर्षांची होणार आहे. 25 जून 1986 रोजी सांगलीतील एका ब्राह्मण कुटुंबात सईचा जन्म झाला. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.इंडस्ट्रीत स्वब ळावर तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सई तीन वर्षा पूर्वी विवाहबद्ध झाली.खरं तर लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते, असे म्हटले जाते. मात्र सईच्या बाबतीत असे काहीही घडलेले नाही. लग्नाआधी ती जेवढी फिल्म्समध्ये बिझी होती, किंबहुना त्याहीपेक्षा ती लग्नानंतर बिझी झाली आहे. अमेय गोसावी हे सईच्या नव-याचे नाव आहे. 
सईच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, तिची लव्ह स्टोरी... 
अशी सुरु झाली सई-अमेयची लव्हस्टोरी...
सईचा नवरा अमेय प्रोड्युसर असून व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात काम करतो. सईला अमेय तिचा मेल व्हर्जन वाटतो. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून सई आणि अमेयची भेट झाली होती. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अमेय दुस-यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. अमेयच्या या चागुलपणांचा कधी कधी मला राग येतो, कारण तो कुणालाही नाही म्हणू शकत नाही, असे सई सांगते.
 
लग्नापूर्वी सासूबाईंना काय म्हणाली होती सई... 
एका मुलाखतीत सईने सांगितले होते, ''काम हे माझं पहिलं प्रेम आहे. लग्न ठरलं तेव्हाच सासूबाईंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, माझं पहिलं प्रेम माझं कामं आहे. त्यानंतर तुमचा मुलगा. त्यांनीही ते मान्य केलं होतं."
 
कधी झाले लग्न...
नोव्हेंबर 2013 मध्ये सई आणि अमेयने रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर 15 डिसेंबरला मुंबईतील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये या दोघांनी लग्नाची जंगी पार्टी आयोजित केली होती. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी पोहोचले होते. वेडिंग रिसेप्शनला सईने डिझायनर साडी परिधान केली होती.
 
लग्नानंतर आलेल्या अनुभवाविषयी सई सांगते, ''काम करणाऱ्या स्त्रीला घरातून पाठिंबा मिळणं महत्त्वाचं असतं. लग्नानंतर खरं तर तुम्ही मनानं स्थिरावता. मनातून हवाहवासा आळशीपणा येतो. मग शारीरिक बदलही तुम्हाला जाणवू लागतात. पूर्वी दोन गोष्टींसाठी धावत असाल, तर आता चार गोष्टींकडे पाहायला लागतं. घरात नवरा आणि माझ्यात भेदभाव केल्याचा अनुभव मला आला नाही. माझ्या पायाला कायम भिंगरी लावलेली असते, हे त्यांनी स्वीकारलं आहे. लग्नानंतरही माझा मोठा मित्रपरिवार कायम आहे. तुमचा नवरा किती समजूतदार आहे आणि घरचे काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. त्या बाबतीत मी खूप लकी आहे."

Post a Comment

 
Top