Add

Add

0

माले(प्रतिनिधी):-'मुळशी धरण परिसरातील गावांमध्‍ये दाट धुके पसरत आहे.पुणे-कोलाड रस्‍त्‍यावरील ताम्हि णी,निवे,डोंगरवाडी,आदरवाडी आदी गावांमध्‍ये धुक्‍याचे प्रमाण जास्‍त असल्‍याने येथे अंधुक वातावरणा मुळे अवघ्‍या काही फुटांवरचेही वाहनचालकांना व्‍यवस्थित दिसत नव्‍हते. धुक्‍यामुळे वाहतूकीवर परिणाम होत आहे.
मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पटटयातील गावांमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून चांगला पाऊस आहे. अनेकवेळा ढग खाली उतरुन धुके पसरत आहे. दिवसेंदिवस धुके पडण्‍याचे प्रमाण वाढत चालले असून धुके दाट होत आहे. सकाळ, दुपार, संध्‍याकाळ दाट धुके पडलेले दिसून येते. मंगळवार दिनांक 28 रोजी  दिवसभर धुके दाटलेले होते. मुळशी बाजुने आदरवाडी गावाकडे पुढे-पुढे जाऊ तसे धुके दाट झालेले दिसले. 
याच परिसरातून जलाशयाच्‍या कडेने पुणे-मुळशी-कोलाड रस्‍ता जात असल्‍याने धुक्‍यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. दाट धुक्‍यामुळे दहा-पंधरा फुटांवरचेही स्‍पष्‍ट दिसत नव्‍हते. गाडया खडडयांमध्‍ये आदळत होत्‍या.समोरचे दिसण्‍यासाठी वाहनचालकांनी वाहनांचे दिवे लावले होते. वळणांवर मोठयाने हॉर्न वाजवावा लागत होता. रस्‍त्‍यावरची वळणे, वाहने स्‍पष्‍ट दिसत नसल्‍याने अनेकांनी आपल्‍या वाहनांचा वेग कमी केला होता. वाहतुक संथ गतीने सुरु होती. संध्‍याकाळ झाली तशी अंधारात वाढ झाल्‍याने अनेकांच्‍या अडचणींत भर पडली. 
धुक्‍यात दिवे व हॉर्नचा वापर... 
समोरचे दिसावे यासाठी वाहनाच्‍या पुढील बाजुचे प्रखर दिवे चालकांनी लावले होते. मात्र दाट धुक्‍याला छेदून प्रकाश पुढे जात नव्‍हता. अवघ्‍या दहा फुटांपर्यंत सरळ काठीप्रमाणे हा प्रकाश दिसत होता. त्‍यामुळे या दिव्‍यांचा विशेष उपयोग होत नव्‍हता. किंबहुना समोरुन येणा-या वाहनाला जवळ आल्‍यावर का होईना आपल्‍या वाहनाची कल्‍पना मिळत होती, एवढाच दिव्‍यांचा फायदा होता.
या दाट धुक्‍यात दुरच्‍या वाहनांचा अंदाज घेण्‍यासाठी हॉर्न वाजवणे प्रभावी व उपयोगी ठरत होते. यामुळे समोरील वाहनांचा अंदाज येत होता. हॉर्नचा आवाज आल्‍यानंतर समोरचे वाहनचालक त्‍यांचा हॉर्न वाजवून प्रतिसाद देत. व आपल्‍या अस्तित्‍वाची एकमेकांना कल्‍पना देत.
----

Post a Comment

 
Top