Add

Add

0
ए.बी.व्ही.पी.चे माजी पदाधिकारी राम बहादुर राॅय यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर्फे राज्यभर तिव्र आंदोलन - आमदार प्रकाश गजभिये 

नागपूर(प्रतिनिधी):- डाॅ.बाबासाहेब आंबेेडकरांनी संविधान लिहिले नसून त्यांनी फक्त शाब्दीक दुरूसत्या केल्या, असे वक्तव्य करणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष व ए.बी.व्ही.पी.चा माजी पदाधिकारी राम बहादुर राय हे देशद्रोही आहेत, असा आरोप करीत त्यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी व केंद्र सरकारने त्यंा च्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यंानी केली. 
     जगात सर्वोकृष्ट संविधान हे भारताचे असून अमेरिकाच नव्हेतर जगाच्या पाठीवर असणारे देश सुध्दा भारताच्या संविधानाची स्तुती करीत आपल्या देशात भारतीय संविधानाचा कसा उपयोग घेता येईल,या दिशेने वाटचाल करीत असतांना केवळ प्रसिध्दीसाठी भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या नावाचा दुरूपयोग करीत भारतीय संविधानाचा अपमान करणे म्हणजे राय बहादुर राॅय यंाच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत, म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरी धर्मनिरपेक्ष विचारंाचा ख-या अर्थाने धडधडीत अपमान आहे. 
     राष्ट्रवादी काॅंग्रेस पाटीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या प्रती अनास्था दाखवून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीच नाही असे विधान करणारे राम बहादुर राॅय यांचा खरपूस समाचार घेत राॅय यांनी संविधानाप्रती आपले अज्ञानच दाखविले व यापूढे बाबासाहेबांच्या विरोधात अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. 
       एकीकडे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात, जर एक चहावाला या देशाचा प्रधानमंत्री होउ शकतो, हे फक्त डाॅ.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच. डाॅ.बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती निमित्त देशाची लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील अनेक राज्यात भारतीय संविधान निर्मीतीत डॅा.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या कार्यावर तीन दिवस चर्चा घडून आली आणि या चर्चेत देशाचे प्रधानमंत्री, विरेाधी पक्ष नेते, अनेक राज्यातील मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांनी बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्मितीत खर्चलेल्या प्रत्येक क्षणावर विस्तृत चर्चा करून त्यांचे कौतुक करण्यात आले. 
       हा सगळा इतिहास राम बहादुर राय यांना माहित असून सुध्दा त्यांनी डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर यंाच्याविषयी केलेेली अपमानजनक विधान हेतुपरस्पर असून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या अध्यक्षपदावरून हाकलून लावावे, अशी मागणीही राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यंानी केली. 

Post a Comment

 
Top