Add

Add

0
ऑलिम्पिक स्पर्धांतील खेळांचे वार्तांकन करणं आणि तेही परदेशातून जाऊन, हे शिवधनुष्य पेललं पुणे जिल्हतील पिरंगुटसारख्या छोट्या गावातून आलेल्या संजय दुधाणे यांनी. पिरंगुट गावातून सुरू झालेला त्यांचा खडतर प्रवास लंडन ऑलिंपिकपर्यंत पोचला, आता पुन्हा रिओ ऑलिम्पिकसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऍक्रिडेशन बहाल केले आहे. ऑलिम्पिक अभ्यासक, क्रीडा लेखक आणि ऑलिम्पिक पत्रकार हा दुधाणे सरांचा प्रवास थक्क करणारा आहे. 
अंगी ध्येय आणि चिकाटी असेल; तर प्रतिकूलतेवरही मात करून नवीन वाटा निर्माण करता येतातच; पण समाजासाठी भरीव असं कार्यही करता येतं. हे समाजातील अनेक व्यक्तींच्या उदाहरणांतून आपण पाहात असतो. मात्र त्यासाठी आपण निवडलेल्या विषयाची आत्यंतिक आवड आणि त्यावरील कमालीची निष्ठा ठेवून अभ्यासूवृत्तीने असं कार्य साध्य करणार्‍या व्यक्ती तशा दुर्मिळच!
क्रीडा पत्रकार आणि लेखक संजय दुधाणे हे अशा जिद्दी आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वापैकीच एक! हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही. कितीही अडथळे आले; तरी ते पार करण्यासाठी अविरत प्रयत्न करायचा. सततचा जनसंपर्क आणि कोणतेही काम रेंगाळत ठेवण्यापेक्षा कधी कधी परिणामांची पर्वा न करता तत्काळ निर्णय घेण्याची त्यांची क्षमता कधी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देते; तर कधी रोषाला सामोरी जायलाही लावते. मात्र आनंदाने हुरळून न जाता किंवा रोषाचं दु:ख करत न बसता दुधाणेंनी आपला पत्रकारितेतला आणि क्रीडा लेखनातला प्रवास चालूच ठेवला. मुळशी तालुक्यातील तेव्हाच्या पिरंगुटसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास त्यांच्या या अंगभूत गुणांमुळेच लंडन ऑलिंपिक, पॅरीसपर्यंत पोहोचला आहे. 
पिरंगुटमध्ये 23 मार्च 1976६ रोजी संजय पांडुरंग दुधाणे हे रत्न जन्मले. आई निरक्षर, वडिलांचे केवळ सही करण्यापुरतेच शिक्षण झालेले. आज पिरंगुट हे गाव शहराचं रूप घेत आहे; मात्र 30 वर्षांपूर्वी इथली परिस्थिती वेगळी होती. शाळा-महाविद्यालय, दळणवळणाच्या साधनांची आजच्यासारखी सोय नव्हती. अशा स्थितीत शिक्षणासाठी सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत होती. दुधाणे यांनीही ती केली. 
1992  मध्ये बारावीची परिक्षा देताच दुधाणे यांच्या कुटुंंबावर संकट कोसळले. पिरंगुटमधील २ एकर जमीनीसह पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील फ्लॅटच्या व्यवहारात त्यांच्या भोळ्याभाबड्या वडिलांना भावाकडून फसव ण्यिात आले. दोन वर्षे ते लवळे, पिरंगुट गावात भाड्याच्या खोलीत रहात होते. वडिलांची विकत घेतलेल्या एक गुंठ्याच्या जागेत मोठा संघर्ष करीत त्यांनी पुन्हा घर  उभे केले. काही वर्षातच आई-वडिलांच्या पुण्याईने त्यांनी  स्वतःचे स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. 
घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणच आपल्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग ठरू शकते, हे त्यांनी जाणलेे. त्यामुळे त्यांनी सुरवातीपासूनच स्वत:ला शिक्षणासाठी झोकून दिले. कधी चार-पाच किलोमीटर चालत; तर कधी दुधाच्या टेम्पोत कॅन्डवर बसून महाविद्यालय गाठले. खेड्यातील सर्वच मुलांना ही कसरत करावी लागत असली; तरी भविष्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे ठरवून वाटचाल करणार्‍या दुधाणे यांनी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुण्याचा रस्ता धरला आणि पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथं आणखी एक वेगळी कसरत त्यांना एक वर्षे करावी लागली; मात्र हीच कसरत पुढे त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरली. 
बालपणापासून खेळाची आवड होती. ऍथलेटिक्स खेळाच्या आंतरशालेय व आंतरजिल्हा स्पर्धांत त्यांनी सहभाग घेतला होता. पायाच्या दुखापतीमुळे त्यांना स्पर्धात्मक खेळ अधिक काळ खेळता आला नाही. तरीही त्यांनी आपली खेळाशी जुळलेली नाळ तोडली नाही.  वयाच्या 18 व्या वर्षी 1994 पासून क्रीडाविषयक लेखनास श्रीगणेशा केला. 
क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा लेखन या क्षेत्रातील भरीव कार्य घडण्याला ही घटना कारणीभूत ठरली असली; तरी या क्षेत्रातील त्यांचे अंगभूत गुण आपण नाकारू शकत नाही. कारण कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यात सर्वांत महत्त्वाचं आहे, ती त्या क्षेत्रातील आवड. नुसती पदवी घेऊन विशिष्ट क्षेत्रात यशस्वी होता येतं, असंही नाही. तसं असतं; तर दुधाणे बीपीएड करून क्रीडा शिक्षक म्हणून सुखवस्तू जीवन जगत राहिले असते; पण माणसाला त्याचा मूळ पिंड स्वस्थ बसून देत नाही. बीपीएडपूर्वी त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला होता. वृत्तपत्र आणि लेखन क्षेत्रातच करीअर करण्याचा त्यांनी दृढनिश्‍चय कृतिबध्द केला. 
मराठी क्रीडा पत्रकारिकतेचा आदर्श...
दुधाणे यांचा मूळ पिंड हा समाजाभिमुख आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा लेखनाबरोबरच त्यांच्या समाजभानाकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षणासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागले. ज्या गैरसोयींना तोंड द्यावे लागले ते आपल्या मागच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून आणि आधुनिक तंत्रयुगाची गरज ओळखून त्यांनी ग्रामीण मानव विकास संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शालेय आणि महाविद्यालयीन मुलांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. संगणक शिक्षण हा त्यांच्या या अनेक उपक्रमांपैकीच एक उपक्रम होता. हे कार्य करीत असतानाच  दै. लोकमत, दै. पुढारी, दै. लोकसत्ता यासारख्या वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारितेला सुरवात केली होती. नियमित वार्ताहर आणि क्रीडापत्रकार म्हणून ते आपला एक वेगळा ठसा तिथं उमटवत होते. त्यांचे 1200 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. ऑलिम्पिक 2012स्पर्धेचे थेट लंडनहून वृत्तांकन,  भारताच्या 2011 इंग्लंड दौर्‍याचे थेट लंडनमधून वृत्तांकन करणारे दुधाणे दिल्लीत झालेल्या विश्‍वकरंडक हॉकी २०१० स्पर्धेचे वृत्तांकन करणारे एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहेत. विश्‍वकरंडक क्रिकेट 2011स्पर्धा आणि सचिन तेंडुलकरच्या 200व्या निवृत्ती कसोटीचे वृत्तसंकलन करण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. पुणे, कोल्हापूर आकाशवाणीवर त्यांचे शेकडो कार्यक्रम झाले आहेत. आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीसाठी थेट प्रक्षेपणाद्वारे वृत्तांकनाच्या संधीचे त्यांनी अनेकदा सोने केले आहे. 
क्रीडपटूंचे चरित्र लेखन ...
 पत्राकारितेच्या सुरूवातीला मुळशी धरणावरून, मुळशीचा सेनापती ही साप्ताहिके चालवीत त्यांनी मुळशीतील अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली. आजचे त्यांच्या साप्ताहिकातील अंकांचा संशोधनासाठी उपयोग होत आहे. 
मुळशीच्या परिघाभोवतीच  समाधान मानीत ते थांबले नाहीत. या पलीकडे आपल्याला झेप घ्यायची आहे आणि ती घेण्याची क्षमता आपल्यात आहे, हे त्यांना माहीत होते. मग एक वेगळी वाट चोखाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो म्हणजे क्रीडापटूंच्या चरित्र लेखनाचा. ज्या क्रीडापटूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारताचे नाव जागतिक पातळीवर नेलं. ऑलिंपिकसारख्या क्रीडास्पर्धांमध्ये यश मिळवलं, मात्र तसेही भारतात ते क्रीडापटू दुर्लक्षित राहिले, अशा क्रीडापटूंना प्रकाशात आणण्याचं महत्त्वाचं काम संजय दुधाणे यांनी केलं आहे. ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव हे खाशाबा जाधव यांचे चरित्र लिहून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीतील पहिलं पदक मिळवून देणार्‍या कुस्तीपटूची ओळख करून दिली. अपार कष्ट आणि संशोधनातून लिहिलेल्या या पुस्तकाला राज्य शासनाचा   सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा शाहू महाराज पुरस्कार तर मिळाला आहेच, पण इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात या चरित्र पुस्तकातील काही भाग समाविष्ट करून पाठ्यपुस्तक मंडळाने दुधाणे, खाशाबा जाधव आणि त्यांच्या चरित्राचाही सन्मान केला आहे. 
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना प्रकाशात आणण्याचं काम जसं त्यांनी केलं तसंच हॉकीचे जादूगर म्हणून सर्व जगाला ज्यांची ओळख आहे त्या मेजर ध्यानचंद यांचेही चरित्र दुधाणेंनी लिहिले आहे. याशिवाय क्रीडापर्वणी, वाटचाल ऑलिंपिकची, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर,अजिंक्यतारा,फ्लाइंग सीख अशी क्रीडा क्षेत्र आणि क्रीडास्पर्धा संदर्भातील अनेक पुस्तके लिहून त्यांनी नव्यापिढीतील क्रीडापटूंना खेळासंबंधीचे सर्व काही असं देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळावर प्रेम आणि संशोधक वृत्ती त्यांना हे सर्व करायला भाग पाडत असली तरी त्यातून जे निष्पन्न होत आहे त्याची समाजाला नितांत गरज आहे, हेही तेवढंच खरं आहे. भारताला आणि भारतातील आजच्या पिढीला ऑलिम्पिक स्पर्धांच्या आजवरच्या प्रवासाचा परिचय व्हावा म्हणून त्यांनी या लंडन ऑलिंपिक स्पर्धांच्या निमित्ताने कथा ऑलिंपिकच्या हे छोटेखानी पुस्तक लिहिले.त्याच्या दहा हजार प्रती विविध शाळांतून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. इथंही क्रीडा स्पर्धा आणि त्यातील रंजक कथांचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच उद्देश त्यांनी मनाशी बाळगला होता. 
सचिनकडून शाबासकी  ...
ऑलिम्पिक खेळाचे अभ्यासक असतानाही सचिन तेंडुलकरच्या अद्भुत खेळीमुळे ते क्रिकेटकडे आकर्षित झाले. या नव्या बंधनातूनच त्यांनी सचिनचे ध्रुवतारा  हे अल्पचरित्र लिहिले. या पुस्तकाच्या  9आवृत्त्या निघाल्या. तिसरी आवृत्ती दस्तुरखुद्द सचिनने प्रकाशित करून त्यांना शाबासकी दिली. 
मुळशीभूषण असलेले दुधाणे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे क्रीडा भूषण आहेत. त्यांनी क्रीडाक्षेत्रात जे कार्य केले, करीत आहेत ते यापूर्वी कोणीच केले नाही. घरातून काहीच पाठबळ नसताना त्यांनी क्रीडाविश्‍वात जी भरारी घेतली ही अभिमानास्पद आहे. वयाच्या ३६व्या वर्षीं त्यांच्या नावापुढे 12 पुस्तके, शेकडो लेख जमा आहेत. पैश्यापेक्षा यालाच ते संपत्ती मानतात. हरिराम आश्रय मठ आणि लेखनाखेरीज सारी दुनिया त्यांना खोटी वाटते. जो आनंद गणोरेबाबांच्या मठात आणि लेखन कलेत आहे तो त्यांना कुठेच गवसत नाही.   
अध्यात्मातून शक्ती ...
संजय दुधाणे केवळ अशी पुस्तके लिहून थांबले नाहीत तर क्रीडावैभव मासिक, भन्नाट, सेनापती, अष्टपैलू अशा दिवाळी अंकांतून ते क्रीडा, साहित्य, समाज, राजकारण... अशा विविध प्रकारांतून ते सतत समाजाशी संवाद साधत असतात. त्यातूनच त्यांचा मोठा जनसंपर्क त्यांच्या कार्याला कधी हातभार लावतो तर कधी पाठीवर कौतुकाची थाप देतो. ऑलिम्पिकविषयीच्या अनेक प्रदर्शनातून त्यांच्या जनसंपर्काची प्रचिती येते. हे सर्व करण्यासाठी त्यांना बळ कोठून येते आणि सतत उत्साही वाटणार्‍या दुधाणेंच्या उत्साहाचे रहस्य काय? असा प्रश्‍न त्यांना बघणार्‍यांना पडणं स्वाभाविक आहे. मला मात्र त्यांच्या या उत्साहाचं रहस्य त्यांच्या आध्यात्मि कतेत असावं असं वाटतं. त्यांना जवळून बघणार्‍या त्यांच्यातल्या धार्मिक वृत्तीचं दर्शन झाल्याशिवाय रहात नाही. पिरंगुट गावचे रहिवासी म्हणून असतील अगर वृत्तीनेच धार्मिक असतील, पण त्यांच्या या वृत्तीतूनच ते पिरंगुट घाटातील प्रसिद्ध संत गणोरेबाबा मठाकडे आकर्षित झाले. निसर्गाच्या कुशीत वसलेला हा मठ स्थिर चित्तवृत्ती आणि मानसिक शांततेसाठी त्यांना आजवर पोषकच ठरला असावा. लेखन बैठकीसाठी आवश्यक असणारी मनाची स्थिर वृत्ती आणि शांतता त्यांना येथे लाभत असावी. मात्र त्यांची संत गणोरेबाबा यांच्या विषयीची भक्ती अशी वरवरची नाही; तर दुधाणे ती या पिरंगुट घाटातील हरिराम आश्रम मठाचा लौकिकही पुस्तक रूपाने दूरवर नेत आहेत. प्रेमनिधी संत सीतामाई आणि प्रेमनिधी संत गणोरेबाबा ही चरित्र पुस्तके लिहून इथंही आपला वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे.
झेप लंडन ऑलिम्पिकची...
शालेय जीवनापासूनच दुधाणेचं नातं खेळाशी जोडलं गेलं. संघर्षातच शिक्षण घेत असताना त्यांनी खेळाशी असलेली आपली मैत्री सोडली नाही. या खेळाच्या मैत्रीतूनच त्यांचं ओघानेच ऑलिम्पिकशीही नातं जोडलं गेलं. कुस्ती, कबड्डी, सचिन तेंडुलकर प्रमाणेच ऑलिम्पिक हा त्यांचा आवडता विषय. अथेन्स2004 पासून ते ऑलिम्पिक पत्रकार होण्यासाठी प्रयास करीत होते. यश काही येत नव्हते. बिजिंग ऑलिम्पिकलाही त्यांना ऍक्रिेडेशन नसल्यामुळे जाता आले नाही. या स्पर्धेच्या काळात ऑगस्ट 2008 मध्ये त्यांनी पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भव्य ऑलिम्पिक प्रदर्शन भरवून ऑलिम्पिकची जागृती केली. त्यांच्या प्रदर्शनामुळे प्रथमच सहा ऑलिम्पिक पदके पुण्यात पहाण्याचा दुर्मिळ योग आला. ऑलिम्पिक, क्रिकेट, कबड्डी प्रदर्शनाचे आयोजन करून क्रीडा प्रचार व प्रसारासाठी सदैव कार्यरत असतात. या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा संग्रहालय उभे करण्याचे महत्त्वाकांक्षी काम मिळाले आहे. 
ऑलिम्पिक विषय नसात भिनलेल्या दुधाणे यांनी गेले तपभर ऑलिम्पिक वृत्तांकनाचा ध्यास घेतला होता. तो 2012 च्या लंडन ऑलिम्पिक निमित्ताने पूर्णत्वास गेला.जगाला आकर्षण असलेल्या ऑलिम्पिकचा एक पत्रकार म्हणून त्यांनाही आकर्षण होतं. मग धडपड सुरू झाली. या ऑलिम्पिकची जाण्याची. पिरंगुटसारख्या एक गावातला मुलगा परदेशात ऑलिम्पिकसाठी जाणार हीच तेव्हा मोठी घटना होती. या अगोदर त्यांनी आपल्या क्रिकेटवेडातून आणि सचिन तेंडुलकरच्या प्रेमातून त्याचं शंभरावं शतक इंग्लंडमध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डस मैदानावर होईल. या आशेवर ते अशीच पदरमोड करून, काही पुस्तके विकून इंग्लंडला गेले होते. म्हणजे तसा परदेश दौर्‍याचा अनुभव असला; तरी हा ऑलिंपिकचा दौरा एक महिन्याचा होता. आणि यासाठीच्या लागणार्‍या परवानग्या मिळवणं मोठं जिकिरीचं होतं.मात्र इच्छा असेल तर मार्ग निघतो याचा प्रत्ङ्ग दुधाणेंच्या सर्वच मित्रांना त्यावेळेस आला. दिव्य पार केल्यानंतर त्यांना हाती लंडन ऑलिम्पिकचे ऍक्रिडेशन आले होते. 
दुसर्‍यांदा लंडनला जाण्यासाठी दुधाणेंनी क्रीडाविषयक पुस्तक विक्रीतून काही निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक महिन्याच्या दौर्‍याचा खर्च मोठा होता. पण या स्पर्धेला जायचंच या भावनेतून त्यांनी पदरमोड करून हा दौरा पूर्ण केला. मुळशीतील ते पहिले क्रीडापत्रकार आहेत ज्यांनी इंग्लंडसारख्या देशात जाऊन ऑलिंपिकच वार्तांकन केलं. या काळात त्यांनी अनेक वर्तमानपत्रांतून स्तंभ लिहिले. दीर्घ लेख लिहिले. बातम्या लिहिल्या. दै. प्रभात या वर्तमान पत्रातील त्यांचं लंडन ब्रिजवरून हे सदर तर त्या वेळी विशेष गाजलं. असे हरहुन्नरी संजय दुधाणे इंग्लंडमध्ये जाऊन केवळ ऑलिम्पिकच वार्तांकन करून थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्याला या ऑलिंपिक दौर्‍यानिमित्त आलेल्या अनुभवाचं शब्दचित्रच रेखाटलं.
  सलग दुसर्‍या वर्षीची लंडन टूरही त्यांच्यासाठी क्रीडापर्वणी होती. भारताच्या लंडन ऑलिंपिक यशाचा षटकार अनुभवणारे प्रा.संजय दुधाणे हे एकमेव मराठी क्रीडापत्रकार.204देश,26खेळ, 10820 क्रीडापटू अशा भूतलावरील सर्वोत्तम सोहळ्याच्या मांदियाळीत त्यांना सहभागी होता आले. गगन नारंग, विजयकुमार, साईना नेहवाल, मेरी कोम, योगेश्‍वर दत्त, सुशीलकुमार या सहाही ऑलिम्पिक विजेत्यांचा खेळ याची देही याची डोळा त्यांनी अनुभवला. लंडन ऑलिम्पिकचे उद्भूत, अलौकिक उद्घाटन व समारोप  समारंभाचे दर्शन त्यांनी याची देही याची डोळा पाहिले. थेट लंडनहून वृत्तांकन करताना त्यांनी अनुभवलेल्या ऑलिंपिक वरील पुस्तक 22मार्च 2013रोजी प्रकाशित झाले. ऑलिम्पिकविषयीचा असा अमृतानुभव देणारं पुस्तक प्रा. संजय दुधाणे यांच्या हातून लिहून झालं. यामागं त्यांचे कष्ट तर आहेत. पण त्याहीपेक्षा या पुस्तकातून दिसतं ने त्यांचं खेळांवरचं प्रेम. या खेळाच्या प्रेमातून त्यांनी या पुस्तकाच्या रूपाने क्रीडासाहित्यात एक मोलाची भर टाकली आहे, जी येणार्‍या पिढीला दिपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत राहील. लंडन ऑलिम्पिकनंतर दक्षिण कोरीयात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची पर्वणी त्यांनी अनुभवली. स्पर्धेनंतर वाटचाल एशियाडचे हे पुस्तक लिहून त्यांनी येणार्‍या पिढीला मार्गदर्शनही लेखन केले आहे. 
शालेय जीवनात खेळाडू असल्यापासून ऑलिम्पिकशी दुधाणे यांचे नाते जुळले. पुढे पत्रकारितेचा श्रीगणेशा करताच देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधवांचे चरित्र त्यांच्याकडून लिहिलं गेलं. तेव्हापासून त्यांना ऑलिम्पिकची अथंागता उमजून आली. ऑलिम्पिक  हा विषय मुळातच आकाशाएवढा मोठा आणि त्याचा स्पर्धात्मक भाग पाहिला तरी तोही महाभारता एवढा मोठा. पण पवित्र गंगेचं थेंबभर पाणीसुध्दा म्हणे घडाभर पुण्य देते. दुधाणे यांना तर लंडन ऑलिम्पिक कुंभमेळ्यात गंगास्नानाचं भाग्य मिळालं. ब्रिटिश राजधानीतील ऑलिम्पिक अमृतानुभवाने त्यांचे क्रीडाजीवन सफल केले. दुधाणे यांनी लंडनला सलग दुसर्‍यांदा जाऊन ऑलिम्पिकचे वृत्तांकन केले हे खरं वाटतच नाही. आता पुन्हा त्यांना ऑलिम्पिक कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज होत आहे. 
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, प्रतिभासंपन्न लेखक आणि साक्षेपी संपादक असलेले दुधाणे पिरंगुटसारख्या छोट्या गावातून सातामुद्रापार स्वतःचा, मुळशीचा आणि मराठी मातीचा  लौकिक वाढविण्यासाठी 2012मध्ये लंडन प्रमाणेच ऑक्सफर्ड, पॅरिसचाही यशस्वी दौरा करून मायदेशी परतले.ऑलिम्पिकमुळे जागतिक पत्रकारांच्या मांदियाळीत त्यांना  सहभागी होता आले. क्रीडा पत्रकारितेच्या अवकाशाची विशालता पाहता आली. त्यांच्यासाठी हे क्षितिज रम्य अनुभवाचे देणे होेते. पिरंगुटसारख्या छोट्या गावातून सुरू झालेल्या माझ्या पत्रकारिकतेला अथांगता प्राप्त करून देणारे..त्यांच्या रिओ ऑलिम्पिक दौर्‍यास विश्‍वमैदानाच्या मनस्वी शुभेच्छा...
                                                                                                              शब्दांकन:- बबन मिंडे
पत्ता  - प्रा. संजय दुधाणे, बी-8, कृष्णलीला टेरेस,
           महात्मा सोसायटीजवळ, कोथरूड पुणे -29  मो. 9822740931
ई-मेल ीरपक्षरूर्वीवहरपशऽसारळश्र.लेा

Post a Comment

 
Top