Add

Add

0

मुंबई(प्रतिनिधी):- कॅटफाईट नवी नाही. पण या वेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असले ल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गाता यंत. बॉलिवूडमध्ये सध्या नवा दोस्ताना फुलू लागला आहे.. कधी काळी एकमेकींचं तोंड बघण्यास उत्सुक नसलेल्या या ग्लॅमर डॉल आता मात्र एकमेकींचं गुणगान गाताना दिसत आहेत. या आहेत बॉलिवूड च्या दोन बब्ली गर्ल आलिया भट्ट आणि श्रध्दा कपूर. आलिया आणि श्रध्दाची मैत्री सध्या बॉलिवूडमधील हॉट टॉपिक बनली आहे. या दोघींनी आपल्या करिअरची सुरुवात बरोबरच केली.

मात्र आलियाला पहिल्या सिनेमापासूनच फेम आणि ग्लॅमर मिळालं. करण जौहरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळविलं. मात्र याउलट श्रध्दाला सुरुवातीला अपयशाचाच सामना करावा लागला. कारण तिचा ‘लव्ह का दी एण्ड’ आणि ‘तीन पत्ती’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नव्हते. याउलट आलिया एकापोठापाठ एक हिट सिनेमा देत होती. श्रध्दाच्या करिअरवर फुलस्टॉप लागण्याची चिन्ह दिसत असताना ‘आशिकी २’ प्रदर्शित झाला आणि रातोरात श्रध्दाला स्टारडम मिळालं..त्यानंतर श्रध्दानेही मागे वळून बघितलं नाही. आता या दोघीही बॉलिवूडमधील मोस्ट डिमांडिंग अ‍ॅक्टड्ढेस बनल्या आहेत..या दोघींमध्ये मैत्रीचं बीज फुलविण्यात वरुण धवनची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगतेय. आलियाने वरुणबरोबर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ नंतर ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमात काम केलं होतं. तर श्रध्दानेही वरुणबरोबर ‘एबीसीडी’ च्या सिक्वेलमध्ये काम केलं होतं. तसेच वरुणची या दोघींबरोबर लहानपणापासूनची मैत्री आहे..त्यामुळे वरुणने या दोघींमधील दुरावा मिटवला असल्याची चर्चा रंगताना दिसतेय. 


आता तर ‘जुडवा’ च्या सिक्वेलमध्येही आलिया आणि श्रध्दा या दोघींना वरुणच्या अपोझिट कास्ट करण्यात आल्याची चर्चा आहे..‘जुडवा’ मध्ये सलमान खानच्या अपोझिट करिश्मा आणि रंभा या दोन नायिका होत्या. आता या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये आलिया आणि श्रध्दाची जुगलबंदी रंगताना दिसणार आहे. आलियाने सिनेमा साईन केला असून श्रध्दाकडून मात्र अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही ग्लॅमडॉलमध्ये खरंच मैत्री झाली आहे की ‘जुडवा’ च्या प्रमोशनला आतापासूनच सुरुवात झाली आहे हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

Post a Comment

 
Top