Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):-झीलएज्युकेशनसोसायटी,नर्हे.येथे दिनांक २१//२०१6रोजी दुसरा आंतरराष्ट्रीययोग दिन साजरा केला गेला.
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जावा हि कल्पना माननीय पंतप्रधान श्री .नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मंडली आणि त्या कल्पनेस मान्यता मिळून आता २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. योगचा उगम  भारतामध्ये ६००० वर्ष पूर्वी पासून असून,योग हे शाररीक,मानसिक सराव जो मनुष्यास चांगली शारीरिक स्थिती आणि मान सिक शांतता ठेवण्यास मदत करते.

झीलने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.त्यामध्ये ६५० शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. योगचे एक तासाची कार्यशाळा घेतली गेली, जी श्री. अरविंद गोयल आणि श्री. सलील पुणेकर यांनी घेतली. झील एज्युकेशनसोसायटीचे कार्यकारी संचालक श्री.जयेश काटकर यांनी श्री.अरविंद गोयल आणि श्री सलील पुणेकर यांचा सत्कार केला. डॉ.अ. ना.गायकवाड, प्राचार्य झील अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी आपल्या दोन शब्दांनी कार्यक्रमाची सांगता केली. डॉ.अ.ना.गायकवाड म्हणाले योग ही आपणास मिळालेली भेट आहे जी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आहे आणि हि फक्त व्यायाम नसून निसर्गाबरोबर एकरूप होण्याचा मार्ग आहे.तसेच योग हे शरीर,मन,क्रिया,विचार  करण्या चे साधन आहे,ज्यातून परीपुर्नातेपर्यंत पोहोचता येईल.या कार्यक्रमासाठी डॉ. कुलकर्णी , प्राचार्य झील तंत्रनिकेतन,तसेच झीलच्या इतर महाविद्यालयांचे संचालक उपस्थित होते.

Post a Comment

 
Top