Add

Add

0
माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील  आंबवणे (ता.मुळशी) येथील गणेश श्रीपत दळवी यांची मुळशी धरण विभाग राष्‍ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली. निवडीचे पत्र राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा परिषदेतील गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारो, राष्‍ट्रवादीचे तालुकाध्‍यक्ष सुनील चांदेरे, विद्यार्थी तालुकाध्‍यक्ष सागर धुमाळ यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले. स्‍वाती हुलावळे, सारिका मांडेकर, चंदा केदारी, पांडुरंग ओझरकर, विजय कानगुडे आदी उपस्थित होते. 'धरण भागातील विद्यार्थ्‍यांना राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठया संख्‍येने सहभागी करून घेण्‍यासाठी प्रयत्‍न करणार' असल्‍याचे दळवी यांनी सांगितले. 

Post a Comment

 
Top