Add

Add

0
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून  प्रियकराकडून मिळाला होता मोबाईल
 वारजे(प्रतिनिधी):- शिवणेतीलशिंदे पुलाजवळअसलेल्यातीन चिंचांची झाडे परिसरातशुक्रवार (दि.१0) च्या रात्रीबारा वाजेच्या सुमारास धारदार हत्याराने वार करून बजरंग सीताराम भरम(वय -38, रा. शिवणे) या रिक्षाचालकाचा खून झाला होता.या खुनात मृत बजरंग भरम याची पत्नी सुवर्णा हिचाच हात असून, तिनेच अनैतिक संबंधांना अडसर ठरत असलेल्या पतीच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपासादरम्यान सुवर्णा हिचे वागणे संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्या अनुषंगाने वारजे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी सुवर्णाला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली. सुवर्णानेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे बजरंग याचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पुढे आले. सुवर्णा आणि आशिष नलावडे याचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. हे बजरंग यास जानेवारी महिन्यात कळल्यानंतर बजरंगने सुवर्णास शिवीगाळ आणि मारहाण केली होती. दरम्यान, आशिषने सुवर्णाच्या संपर्कात राहता यावे, म्हणून तिला एक मोबाईल घेऊन दिला, जो ती कामावरच वापरत आणि ठेवत होती. त्यावरूनच त्यांनी बजरंग भरम यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी पत्नी सुवर्णा बजरंग भरम (वय-34,रा. शिवणे), सविता दत्तात्रय काळे (वय 32,रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर), आशिष रोहिदास नलावडे (वय-28,रा. शिवणे), बाळू किसन पाकिरे (वय-34, रा. रायकर मळा, धायरी), नितीन बबन येडे (वय-24,रा. मोरेवस्ती,पद्मावती) यांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. मृत बजरंगचा भाऊविलास सीताराम भरम(वय-41, रा. शिवणे) यांनी वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबतवारजे पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार,बजरंग शुक्रवारी (दि.10) रात्री घरी जात असताना आशिष आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून कर्वेनगर येथूनच दुचाकीवरून बजरंगचा पाठलाग सुरू केला. गणपती माथ्यापुढील मोकळ्या मैदानाच्या पुढे अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी बजरंगला अडवून त्यांच्याकडील कुर्‍हाड आणि कोयत्याने वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 
सदर गुन्हा पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त तुकाराम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जगताप, मनमीत राऊत, सहायक पोलीस फौजदार जगन्नाथ गोरे, पोलीस हवालदार हरिश्‍चंद्र केंजळे, चंद्रकांत मोरे, पोलीस नाईक संतोष देशपांडे, पोलीस शिपाई योगेश सुळ, संजय दहिभाते, विजय कांबळे, अजय सावंत, सचिन धोत्रे यांच्या पथकाने उघडकीस आणले. याप्रकरणी पोलीस मित्र व खबरी यांचेही सहकार्य घेण्यात आले.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी आशिष नलावडे हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत, तर सुवर्णालादेखील दोन मुले आहेत. आशिष हा कर्वेनगर परिसरात सुवर्णा घरकाम करत असलेल्या भागातच एका डॉक्टरच्या गाडीवर वाहनचालक म्हणून काम करत होता, तर त्याचे साथीदार बाळू पाकिरे हादेखील त्याच डॉक्टरच्या चारचाकीवर वाहनचालक म्हणून काम करत होता. तर नितीन येडे हा काहीही कामधंदा करत नव्हता. हल्लेखोरांनी कोणताही पुरावा मागे न ठेवता केलेल्या या गुन्ह्याचा मोठय़ा कौशल्याने वारजे पोलिसांनी तपास लावला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चे बोलणे आणि भेटीगाठी ठरत होत्या. वारजे : शिवणेतीलशिंदे पुलाजवळअसलेल्यातीन चिंचांची झाडे परिसरातशुक्रवार (दि.१0) च्या रात्रीबारा वाजेच्या सुमारास धारदार हत्याराने वार करून बजरंग सीताराम भरम(वय -38, रा. शिवणे) या रिक्षाचालकाचा खून झाला होता. या खुनात मृत बजरंग भरम याची पत्नी सुवर्णा हिचाच हात असून, तिनेच अनैतिक संबंधांना अडसर ठरत असलेल्या पतीच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

Post a Comment

 
Top