Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-'हा देश कोणाची जहागीर नाही असे ठणकावून सांगत देश विघातक ,सांप्रदायिक शक्तींना साथ देणार नाही ,समाजात दुहीचा चुकीचा संदेश देणाऱ्यांना साथ देणार नाही ' असे प्रतिपादन आज राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले . 
कौसरबाग -कोंढवा (पुणे ) येथील 'दावत -इ -इफ्तार ' कार्यक्रमात ते बोलत होते . मुस्लिम  आणि सर्व धर्मीय धर्मगुरू  ,खासदार सुप्रिया सुळे ,खासदार वंदना चव्हाण ,महापौर प्रशांत जगताप ,अनिस चिश्ती ,पी ए इनामदार ,आबेदा इनामदार ,आमदार जयदेव गायकवाड ,बिशप नरेश अंमबिया ,सय्यद जलालुद्दीन ,इक्रम खान ,बलवीरसिंग,इकबाल शेख ,हाजी झाकीर शेख ,आमदार अनिल भोसले ,मौलाना इलारीस काझी ,मौलाना अब्दुल समद ,मौलाना अक्रम मदनी ,मौलाना निजामुद्दीन ,मौलाना अफझल खान , उपस्थित होते 
शरद पवार म्हणाले ,'पुणे हे शांती आणि सलोखा बाळगणारे कॉस्मोपॉलिटन शहर आहे ,येथे सर्व धर्मीय ,सर्व भाषिक ,सर्व प्रांतीय लोक राहतात . एकत्र सलोख्याने राहणे ,हे पुण्याचे  वैशिष्ट्य आहे . पण ,देशात वेगळे वातावरण तयार करण्याची चर्चा होत आहे . हा देश काही लोकांची जहागीर असल्याची बेजवाबदार वक्तव्ये केली जात आहेत . अशा लोकांना पाठिंबा देऊ नये . 
देश मजबूत करणे ही प्रत्येक धर्माची जबाबदारी आहे . देश विघातक ,सांप्रदायिक शक्तींना आम्ही साथ देणार नाही . आज या कार्यक्रमात फक्त 'दुआ ' मागू ,इतर काही मागणार नाही . शेतकऱ्यांसाठी 'दुआ ' मागू . भूक मुक्तीचे वातावरण तयार व्हावे ,सलोखा -शांततेचे वातावरण व्हावे यासाठीच प्रार्थना करू . देशाला प्रगतीच्या रस्त्यावर नेण्यासाठी ताकद द्यावी 
पी ए इनामदार म्हणाले ,'प्रेमाचे वातावरण असलेला हा कार्यक्रम राजकारण विरहित आहे . सर्व समावेशक आहे ,त्यासाठी महापौर आणि शरद पवार साहेबांचे आम्ही आभारी आहोत 'या इफ्तार कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती 

Post a Comment

 
Top