Add

Add

0
                       गरजू महिलांना पिको फॉल मशीनचे वाटप
पौड(प्रदीप पाटील) :- मुळशी तालुक्यातील ५१ लाभार्थी महिलांना मुळशी पंचायत समितीचेसदस्य व शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्याफंडातून पिको फॉल व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याकरिता शिवसेनेच्यामहिला आघाडीने विशेष पाठपुरावा केला होता. मुळशी तालुक्यातील महिलांनाआर्थिक बाबतीत सबल करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमाने महिला बचत स्थापनकरून त्यामाध्यमाने गृहउद्योग उभा करणे, यासाठी पुढाकर घेणार असल्याचीमाहीती यावेळी बोलताना बाळासाहेब चांदेरे यांनी दिली. या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेच्या महिला तालुका संघटिका,गीताताई गुजर, सूसच्या सरपंचमीरा देवकर, कावेरी सुतार, मीनाताई चांदेरे, मेघा चांदेरे, सुरेखा शेळके,सीमंतिनी चांदेरे, हिराबाई तुपे, अरविंद तायडे, सोमनाथ कोळेकर, सोमनाथ
कोळेकर व शिवसेनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महिला तालुका प्रमुखगीताताई गुजर यांनी प्रास्ताविक केले व आभार भीमाबाई मोरे यांनी मानले.

Post a Comment

 
Top