Add

Add

0
पुणे-(शरद लोणकर ):-माणूस किती ही स्वार्थी होत चालला , पैशाच्या मागे आणि ऐहीकसुखाच्या मागे धावत राहिला तरी तो प्रेमाशिवाय जगू शकत नाही , निव्वळ स्वतःवर फार काळ कोणी प्रेम करून जीवन कंठत नाही असे मत येथे अभिनेता रणदीप हुडा याने तर,'आयुष्यात प्रेम आणि त्या सोबतीला संगीत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही, श्रीमंत असो,मध्यमवर्गीय असो किंवा खूप गरीब असो पण सर्वांच्याच जीवनात प्रेम आणि संगीत यांना  महत्वपूर्ण स्थान पूर्वीपासूनच  आहे असे मत अभिनेत्री काजल अगरवाल हिने येथे व्यक्त केले .

' डॉ लब्जोकी कहानी' हा दीपक तिजोरी दिग्दर्शित चित्रपट येत्या १० जूनला प्रदर्शीत होतो आहे . या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेसाठी ते येथे आले होते. 
या चित्रपटाच्या प्रेमकथेत नाविन्य काय ? या प्रश्नावर या दोघांनी यावेळी मनमुराद भाष्य केले . 
प्रेमकथा .. यात वेगळे फारसे काही नसते पण तरीही त्या मनाला भावतात . यात संगीताला खूप महत्व असते . नाही तर काय ? .. प्रेम, प्रेम, प्रेम साऱ्यांचेच सेम असते .. पण तरीही प्रत्येकाच्या आयुष्याची वाटचाल विशेष असते. मानवी जीवन आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सुसंगत आणि निगडीत आहे जसे नाण्याला छापा आणि काटा असतो . माणूस आणि प्रेम या डॉ गोष्टी अलग अलग राहूच शकत नाहीत . ना प्रेमाला भाषा असते ना प्रेमाची व्याख्या काही असते . असेही रणदीप हुडा म्हणाला . 
' डॉ लब्जोकी कहानी'या चित्रपटात मी अंध नायिका साकारली आहे , या भूमिकेच्या तयारी साठी महिनाभर मी अंध शाळेत रोज जात होते . तिथल्या मुलींशी भेटी गाठी घेणे , त्यांच्यात तास  न तास घालविणे असे करीत मी माझ्या पत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला . मौसमी चटर्जी ने अनुराग सिनेमात केलेली भूमिका किंवा रामेश्वरी ने अंध नायिकेची केलेली भूमिका दुर्दैवाने पाहिली नाही . असे हि ती म्हणाली .
रणदीप हुडा म्हणाला आज काल कथेतील पात्रे साकारताना .. त्यानुसार निव्वळ अभिनय येवून चालत नाही तर शरीर संपदा हि प्राप्त करवून घ्यावे लागते .. कधी वजन वाढवावे लागते तर कधी कमी करावे लागते . या चित्रपटात मी वजन वाढविले आहे . अंध नायिकेवर प्रेम करणारा आणि या प्रेमासाठी जीवनाची लढाई लढणारा नायक मी साकारला आहे .या चित्रपटात 6 गाणी आहेत . अरमान मलिक , सुखविंदर सिंग ,अंकित तिवारी कणिका कपूर, पलक मुछाल यांनी ती गायली आहेत . गाणी संगीत हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे जे आजच्या तरुणाईला नक्की आवडेल .

(P R - PUNE - SHARAD LONKAR-9423508306/9890725049)

Post a Comment

 
Top