Add

Add

0
पुणे : (प्रतिनिधी):-खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे शहर व महिला विभागाच्या वतीने "स्वछंदी भरारी अभियानास' प्रारंभ झाला. खासदार शहराध्यक्ष ऍड.वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 27 जून रोजी जिजामाता हायस्कूल, मामलेदार कचेरी समोर येथे अभियानाला सुरुवात झाली. अभियानातंर्गत बीट मार्शल आरती कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी विद्यर्थीनींना मार्गदर्शन केले. 
यावेळी खासदार ऍड.वंदना चव्हाण  मार्गदर्शन करताना म्हणाल्या, "प्रत्येक महिलेने आपले स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. पोलीस महिलांच्या सुरक्षितेसाठी सतत जागरूक असतातच; परंतु प्रत्येक महिलेने आपले स्वरक्षण करणे जास्त गरजेचे आहे.स्व रक्षणाने आत्मविश्वास वाढतो. काही गोष्टी विद्यार्थिनी खुलेपणाने बोलू शकत नाहीत त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तक्रारपेटीचा विद्यार्थिनींनी लाभ घेतल्यास त्यांच्या समस्या समजण्यास आणि समस्येचे निराकरण करण्यास सोपे होणार आहे.'
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले होते. यावेळी कसबा महिला विभाग अध्यक्ष वनिता जगताप, पद्‌मा कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती अध्यक्ष मनाली भिलारे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चव्हाण, शिक्षक व इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली चाकणकर यांनी केले.
यावेळी बीट मार्शल आरती कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी न घाबरता आपल्याला येणाऱ्या समस्या सांगणे गरजेचे आहे. जागरूकता, निर्भयता आणि धीटपणा प्रत्येक महिलेमध्ये आवश्यक आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींना एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे ज्याद्वारे त्या आपल्या समस्या आणि तक्रारी सोडवू शकतात. विद्यार्थिनींनी स्वत: सजग राहणे गरजेचे आहे.  या उपक्रमांतर्गत विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी बीट मार्शल, हेल्पलाईन आणि तक्रार पेटी शाळांमध्ये देण्यात आली आहे.  तसेच "प्रतिसाद ऍप' डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा. 
प्रास्ताविकात बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या," खासदार शहराध्यक्ष ऍड.वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमातंर्गत शाळेमध्ये एक तक्रारपेटी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनींच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण शाळेमार्फत बीट मार्शल आणि हेल्पलाईनद्वारे केले जाणार आहे.'

Post a Comment

 
Top