Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-'नृत्याची आवड असल्यामुळे मुंबईत आलो.मात्र,पाच वर्षे प्रचंड संघर्ष करावा लागला. राहण्याची सोय नसल्याने रेल्वे स्टेश नवर झोपलो.अनेकदा पोलिसांनी तेथून हाकलूनही दिले. कधी-कधी तर त्यांचा मारही खावा लागला.पण,जिद्द सोडली नाही.त्यामुळेच कोरि ओग्राफर,अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास करता आला... हे सांगत होता नृत्यगुरू रेमो डिसूझा. 
"डान्स प्लस 2‘या शोमध्ये रेमो सुपर जज्जची भूमिका बजावणार आहे. यासह नृत्य अन्‌ आपल्या आयुष्या च्या खडतर प्रवासाविषयी बोलताना त्याने आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला,"माझं शिक्षण गुजरातमध्ये झाले.बालपणापासूनच नृत्याची आवडहोती.मात्र,वडिलांचा त्याला विरोध होता.ते एअरफोर्समध्ये नोकरी करत असल्याने मला पायलट म्हणून पाहण्याची त्यांची इच्छा होती.पण,मी हट्ट सोडला नाही.ज्यावेळी मुंबईत आलो,त्यावेळी अनेक दिवस रेल्वे स्टेशनवरच झोपलो.रात्रीच्यावेळी गस्तीसाठी पोलिस आल्यानंतर त्यांनी हाकलूनही दिले.पण, जिद्द सोडली नाही.‘‘ 
सुरवातीच्या काळात अहमद खान,अनुभव सिन्हा व अन्सल मेहता यांनी नृत्यासाठी प्रोत्साहन दिले,असे सांगून रेमो म्हणाला,"मुंबईत नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले,त्या वेळी फक्त पाच ते सहा विद्यार्थीच माझ्याकडे प्रशिक्षण घेत होते. आता त्यांची संख्या चारशे ते पाचशेपर्यंत गेली आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये नृत्याबद्दल प्रचंड ज्ञान व ऊर्मी आहे.त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून,अशा मुलांसाठी भविष्यात काहीतरी करण्या ची इच्छा आहे.आजही माझे अनेक विद्यार्थी जाहिरात, मालिका, चित्रपट अन्‌ कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत, याचा मला आनंद आहे.‘‘ 
पुण्यात प्रशिक्षण वर्गाची इच्छा 
"डान्स प्लस 2‘या शोच्या माध्यमातून नवीन नृत्य आविष्कारांचे सादरीकरण होणार आहे.यातील प्रत्येक स्पर्धकाची कथा वेगळी असून,ती नृत्याची पारंपरिक संकल्पना मोडीत काढणारी ठरणार आहे.नालासोपारा मधील अनेकांना नृत्यविषयक अनेक शोमध्ये संधी मिळाली आहे.अशाच प्रकारची गुणी मुले पुण्यातही असून, त्यांच्यासाठी आगामी काळात नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची इच्छा असल्याचे रेमो याने सांगितले.

Post a Comment

 
Top