Add

Add

0
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एमआयटीमध्ये योग प्रशिक्षण शिबिर

पुणे(प्रतिनिधी):- “शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजारांना दूर ठेवणे शक्य होते. तसेच सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे नियमित योगसाधना केली पाहिजे,” असे प्रतिपादन योगाचार्य मारुती पाडेकर यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणे, भारततर्फे आंतरराष्ट्रीर रोगदिनाचे औचित्र साधून कोथरूड रेथील माईर्स एमआरटीच्रा प्रांगणात रोग प्रशिक्षण शिबीराचे आरोजन करण्रात आले होते. त्यावेळी शिबिरात सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना पाडेकर बोलत होते. याप्रसंगी शार्प इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक टोमियो इसोगाई, जापनीज कॅलिग्राफर कझुको बारिसिक, बडवे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सौ. बडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआरटीचे संस्थापक अध्रक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक दीपक आपटे, एमएसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. एन. मोरे, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. रामचंद्र पुजेरी, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये यांच्यासह माईर्स एमआरटी शिक्षणसंस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी रा रोग प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेची प्रेरणा देण्याचा संकल्प केला.
मारुती पाडेकर यांनी शिबिरार्थींना योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. पाडेकर म्हणाले, “आजच्या तरुण पिढीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर त्यासाठी तरुणांना योगाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यातून त्यांच्यातील चंगळवादी व व्रसनाधीन वृत्ती दूर होईल. तसेच बौध्दिक व शारीरिक उन्नती होईल. या पिढीचा विचार करुन एमआरटीने आरोजित केलेल्रा रोगप्रशिक्षण शिबीराचे विशेष महत्त्व आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतामध्ये पतंजलींसारख्या अनेक ऋषींनी योगाची रुजवण केली. आज तीच परंपरा बीकेएस अय्यंगार, शेलारमामा आणि रामदेवबाबा यांनी पुढे चालू ठेवली. योगाकडे धार्मिकतेच्या नजरेतून बघितले गेल्याने त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. परंतु, संयुक्त राष्ट्राने योगाचे महत्त्व अधोरेखित करुन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे स्वागत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभर उत्स्फूर्तपणे योगदिन साजरा करण्यात पुढाकार घेतला, ही स्वागताची बाब आहे. योगदिनाच्या माध्यमातून तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा प्रयत्न होत आहे.”
सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. आभार डॉ. संजय उपाध्ये यांनी मानले.

Post a Comment

 
Top