Add

Add

0

माले(प्रतिनिधी):- गेल्‍या काही महिन्‍यात झालेला अवकाळी पाऊस. त्‍यामुळे आंब्‍याच्‍या झाडांचा गळालेला मोहोर. यामुळे मुळशी धरण परिसरातील आंब्‍याचे उत्‍पादन कमी झाले आहे. त्‍यातच उशिरा पाड लागत अस ल्‍याने किंमतही मिळेनाशी झाली आहे. 
यंदाच्‍या उष्‍ण वातारणामुळे मुळशी धरण परिसरात आंब्‍याला चांगला मोहोर आला होता.झाडे मोहोरानी बहरून गेली होती. परंतू गेल्‍या काही महिन्‍यांत झालेल्‍या अवकाळी पावसाने ऐन बहरात आलेला मोहोर दोनदा गळाला. त्‍यामुळे आंब्‍याचे उत्‍पादनगतवर्षीपेक्षा निम्‍म्‍याने कमी झाले.त्‍यातच धरण परिसरात आंब्‍याला उशिरा लागणारा पाड ही दरवर्षीची समस्‍या. पाड लागल्‍या शिवाय आंबे उतरवताही येत नाहीत.
कोकण,कर्नाटक, इतर भागातील आंबा दोन महिन्‍यांपुर्वीच बाजारात दाखल झाला.लवकर बाजारात आल्‍याने तसेच अक्षय तृतीयेच्‍या मुहूर्तावर या आंब्‍याला चांगला भाव मिळतो.वटपोर्णिमेनंतर बहुतांश लोक आंबा खायचे व खरेदीचे प्रमाण कमी होते.
जुनच्‍या पहिल्‍या आठवडयात पावसाला सुरवात होते. नेमका याच कालावधीत धरण परिसारातील आंबा पिकण्‍यास सुरुवात होते. अवकाळी पावसामुळे गळालेला मोहोर, उशिरा पिकणे याचा दुहेरी फटका या भागातील आंबा उत्‍पादकांना बसला आहे.घरी खाऊन नातेवाईकांना वाटण्‍यात येतोय.व्‍यापारी भाव पाडून मागत असल्‍या ने मुळशी,निवे,जामगाव,वांद्रे, पिंपरी, भांबर्डे, आंबवणे आदी गावांतील उत्‍पादक हवालदील झाले आहेत. काहींनी रस्‍त्‍याच्‍या कडेला स्‍वतः विक्री करण्‍यास सुरवात केली आहे. हापुस, पायरी कमी तर रायवळ, गोटीला पडेल भावात देण्‍याची वेळ विक्रेत्‍यांवर आलीय.
याबाबत जामगावचे आंबे विक्रेते चिंतामण सुर्वे म्‍हणाले,''यंदा आंब्‍याला चांगला मोहोर आला होता. अवकाळी पावसाने मोहोर गळाला. भाव मिळत नाही. दीडशे रुपयांनी हापुस, शंभर रुपयांनी पायरी एक डझन विकतोय. गेल्‍यावर्षी पेक्षा अर्धेही उत्‍पन्‍न नाही. खपतील ते खपतील बाकीचे नातेवाईकांना देतोय.''

Post a Comment

 
Top