Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे 40 लाख लिटर पाणी (0.4एमएलडी) उपलब्ध होण्याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी याबाबत पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांची यासंदर्भात बैठक करून दिली असून या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दौंड रेल्वे स्थानकावर पाणी उपलब्ध होण्यासाठी या दोन्ही विभागांच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून स्थानकासाठी साडेतीन कोटीचा निधी याआधीच मंजूर झाला आहे. याबद्दल पुढील कार्यवाहीसाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेऊन पाटबंधारे आणि रेल्वे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. पाटबंधारे विभागाने हे लागणारे पाणी थेट कालव्यातून रेल्वे विभागाने  उचलावे  असा प्रस्ताव रेल्वेकडे दिला आहे, यामुळे दौंड स्थानकाला कायमस्वरूपी पाणी मिळू शकेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासंदर्भातील अहवाल तयार करणार असून येत्या शुक्रवारी दि.10जून रोजी प्राधिकरण पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहे.
सन 2010 मधील मंजूर मागील प्रस्तावानुसार साडेतीन कोटीचा निधी दौंड रेल्वे स्थानकाच्या पाण्या साठी उपलब्ध झाला होता, परंतु यावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा निधी परत जात होता, मा.सुप्रियाताईंनी यासाठी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांच्यात बैठक घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्यासाठी 10 किमीची पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याबाबत अहवाल तयार करणार असून हा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर लवकरच काम सुरु होईल.    

      थेट कालव्यातून पाण्याचे नियोजन झाल्यास दौंड रेल्वे स्थानकाची दररोजची पाण्याची गरज पूर्ण होणार असून प्रवासी, रेल्वेत वापरण्यासाठी तसेच स्थानकावर आवश्यक पाणी पुरेसे उपलब्ध होणार आहे. दौंड स्थानकाची तहान यामुळे भागणार आहे. या बैठकीस सोलापूर विभागाचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी श्री.के.आर.देवनाळे, श्री.नजीब मुल्ला, श्री.मीना, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री.कपोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री.यमगर, श्रीमती वैशाली आवटे आदी उपस्थित होते.  

Post a Comment

 
Top