Add

Add

0
                       पिंपळोलीच्या शिंदे दांपत्याचा अनोखा उपक्रम
पौड (प्रदीप पाटील) :- स्वत:चा जन्मदिवस अथवा लग्नाचा वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये जाऊनआपल्या नातेवाईक व मित्रांना पार्ट्या देवून साजरा करण्यात अनेकांनामोठेपणा वाटतो व केवळ दिखाऊपणा करण्यासाठी मोठ्याप्रमाणात पैशाचीउधळपट्टी केली जाते. परंतु, सामाजिक भान ठेऊन मुळशी तालुक्यातील पिंपळोलीगावाचे अविनाश शिंदे व शारदा शिंदे हे दांपत्य मात्र गेली अनेक वर्षेआपल्या लग्नाचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबउन साजरा करते.
यावर्षी या दांपत्याने आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस आणखीनच वेगळ्यापद्धतीने साजरा केला. अविनाश शिंदे यांचा पिरंगुट येथे स्वत:चाइलेक्ट्रिचा व्यवसाय आहे. आपला व्यवसाय सांभाळत असतानाच आपण समाजाचे काहीदेणे लागतो या भावनेतून शिंदे मुळशी तालुक्यात व पुणे शहरात सातत्यानेव्यक्तिगत पातळीवर व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमाने विविधप्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात.  पुणे येथील डोनेट एड यासंस्थेशी संपर्क करून शिंदे यांनी पर्यावरण दिनामिमित्त व स्वत:च्यावाढदिवसाचे औचित्य साधून पौड येथील कातकरी वस्तीलगतच्या पडीक जमिनीवरत्यांनी विविध प्रकारची २६ फळझाडे लाऊन व तेथील कातकरी बांधवाना मिठाईचेवाटप करून त्यांनी आपला वाढदिवस आपले कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थितीतअनोख्या पद्धतीने साजरा केला.त्या ठिकाणी त्यांनी केवळ वृक्षारोपण न करताती त्या झाडांचे संरक्षण व्हावे याकरिता लोखंडी ट्री गार्डही बसविलेआहेत. आपल्या या वेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाच्या संकल्पनेबाबत त्यांनाविचारले असता ते म्हणाले की, सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्यावृक्षतोडीमुळे निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल व त्यामुळे निर्माणझालेल्या समस्या याकरिता सर्वांनीच वृक्षलागवड व संवर्धनाच्या बाबतीतजागृत होण्याची गरज आहे.त्याची सुरुवात स्वत:पासून करावी या हेतूनेलग्नाच्या वाढदिवसाचे व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपणकरण्याचे ठरविले. कुटुंबातील अन्य नातेवाईक, मित्र यानाही यामुळे प्रेरणामिळण्यास मदत होते. पौड कातकरी वस्तीतील कातकरी स्वत:च्याउदरनिर्वाहासाठी मासेमारी बरोबरच नजीकच्या जंगलातील लाकडाच्या मोळ्या जमाकरून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे जंगलाची मोठ्याप्रमाणात हानी होते. यावर उपाय म्हणून त्यांच्याच वस्तीनजीक जीवन संवर्धनसंस्थेला वनविभागाकडून दीड एकर जमीन वनसंवर्धनासाठी तात्पुरत्यावापरासाठी दिली आहे. या जमिनीवर सध्या विविध प्रकारची फळझाडे व वनौषधीचीलागवड करण्यात येत असून या झाडांचे पालकत्व वस्तीवरील कातकरी बांधवांनाचदेण्यात आले आहे. या झाडांमुळे भविष्यकाळात कातकरी बांधवाना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना सचिन आकरेयांनी दिली. याप्रसंगी साई एज्युकेशनचे सातव, शेडगे, सोपान वांजळे, अनिलकरंजावणे, दिलीप करंजावणे, शंकर गोडांबे, चंद्रकांत जावळे, निखील शिंदे,शुभम शिंदे विद्या, घारे, मनीषा करंजावणे,पौडचे ग्रा.मा.सदस्य ढगे,दिलीप गुरव,सुरेखा कडू, सचिन आकरे, सारिका नकाते आदी उपस्थित होते.यावेळी कातकरी बांधवाना मिठाईचे वाटपही करण्यात आले.

Post a Comment

 
Top