Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):-इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळा च्या सात उच्च व कनिष्ठ महाविद्या लयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायमठेवली आहे.या परीक्षेत संस्थेचा एकूण निकाल 88.50 टक्के लागला आहे.संस्थेचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशस्वी विद्यार्थीआणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

        संस्थेच्या वेगवेगळे अभ्यासक्रम असलेल्या तीस शाखांतील 9450 विद्यार्थीपरीक्षेला बसले होते. त्यापैकी 8364 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण 88.50 टक्के आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेत 15कनिष्ठ महाविद्यालयातून 2923 पैकी 2752 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशाखेचा संस्थेचा निकाल 94.15 टक्के आहे. या विभागात सूपे, न्हावरे, कळस,सविंदणे या चार उच्च माध्यमिक शाखांचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तरनऊ विद्यालयांचे निकाल 90 टक्केच्या पुढे आहेत.
        वाणिज्य शाखेचा निकाल 92.22 टक्के लागला आहे. या विभागात बावीसशाळांमधील 3188 पैकी 2940 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मोशी,वेल्हा, चऱ्होली या विद्यालयांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तर 15शाळांचे निकाल नव्वद टक्केच्या पुढे आहेत. कला शाखेत 25 शाळांतील 1871पैकी 1439 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागात संस्थेचा एकूण निकाल76.91 टक्के लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल 83.99 टक्केलागला आहे. या विभागात संस्थेच्या 23 शाखांतील 1468 पैकी 1233 विद्यार्थीउत्तीर्ण झाले.
        दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेच्या विविध शाखांनी बारावीच्या परीक्षेतघवघवीत यश मिळविले. विद्यार्थ्यांचे परीश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन,गुणवत्तावाढीसाठी संस्था राबवित असलेले विविध उपक्रम यामुळे निकालामध्ये
वाढ झाली असल्याचे संस्थेचे मानद सचिव संदीप कदम यांनी सांगितले. यावेळीअध्यक्ष प्रतिनिधी राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिवपी.ई.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top