Add

Add

0
          शाळेच्या पहिल्या दिवशीत विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके ....
पौड(प्रदीप पाटील):- मुळशी तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनेतालुक्यातील तालुक्यातील 225 जि.प.शाळा व खाजगी संस्थांच्या अनुदानित 34 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्याकरिता पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडूनशाळासुरु होण्याच्या पुरेसे अगोदरच पुस्तके उपलब्ध करून संबधित शाळांच्याताब्यात पुस्तके देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पिरंगुट येथीलपिरंगुट इंग्लिश स्कूल शाळेत सर्व पुस्तके उतरविण्यात आली असून बहुतांशीशाळांना त्यांच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाने दिली आहे. तालुक्यात एकूण 259 शाळांच्या सेमी व मराठी माध्यमाच्या इ. 1ली ते 8 वी च्याविद्यार्थ्याकरिता सुमारे 108611 पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. सदरपुस्तक वाटप प्रक्रिया सुरळीत व्हावी याकरिता स्वत: गटशिक्षणाधिकारीतांबे, विस्तार अधिकारी वाळूंज,लोखंडे तसेच आयडी विभागाचे पदाधिकारी लक्षदेत असून विषय तज्ञ व केंद्रप्रमुख जबाबदारी आहेत.

Post a Comment

 
Top