Add

Add

0
माले,(प्रतिनिधी):- मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी आमदार शरद ढमाले यांची बिनविरोध निवड झाली. पदाधिकारी निवडीसाठी झालेल्‍या सभेत नुतन कार्यकारी मंडळाच्‍या इतर पदाधिका-यांचीही निवड बिनविरोध झाली.  
मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-उपाध्‍यक्ष-शरद शेंडे,श्रीकांत कदम सरचिटणीस-रमेश जोरी, कार्याध्‍यक्ष- महादु शेंडे पाटील, खजिनदार-वसंत काळोखे ,सहसचिव-दत्‍तात्रेय सुर्वे,सुनिल पासलकर,नामदेव जाधव ,कार्यकारी सदस्‍य-रामचंद्र दातीर,विजय ढमाले,विनोद कंधारे, अनिल आधवडे, निवृत्‍ती जोरी. कायम निमंत्रीत सदस्‍य-प्रभाकर कंधारे याप्रमाणे निवड झाल्‍याची माहिती सुर्वे,आधवडे यांनी दिली. अनुदानित खेचरे येथे अप्‍पासाहेब ढमाले माध्‍यमिक विद्या लय,माले येथे सेनापती बापट माध्‍यमिक विद्यालय,विनाअनु दानित वांद्रे येथील बाबुराव ढमाले माध्‍यमिक विद्यालय व टाटा कंपनीच्‍या सहकार्याने माले येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था याप्रमाणे मंडळाच्‍या शाखा आहेत.
----

Post a Comment

 
Top