Add

Add

0
माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील  वाघवाडी येथून तरुण बेपत्‍ता झाला आहे. निलेश आनंदा रोकडे, वय-२२, रा.वाघवाडी, ता.मुळशी असे बेपत्‍ता झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. मंगळवार (ता.१४) सकाळी पावणे आठच्‍या सुमारास निलेश तो शिक्षण घेत असलेल्‍या, माले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत जातो,असे सांगून बाहेर पडला. त्‍यानंतर तो परत आला नाही. त्‍याचे वर्णन पुढीलप्रमाणे रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, बांधा मध्‍यम, केस काळे बारीक, अंगात औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचा निळसर शर्ट,काळी पॅंन्‍ट आहे.तो आढळून आल्‍यास पौड पोलिस स्‍टेशन -०२०-२२९४३१३३, पोलिस नाईक जय पवार-८३०८८०२५२७ यांच्‍याशी संपर्क साधावा.

Post a Comment

 
Top