Add

Add

0
माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील  पोमगाव (येथील खिंडीत सातफुटी अजगर मृतावस्‍थेत आढळला. अज्ञातांनी तोंड ठेचून मारल्‍याने अजगराचा मृत्‍यु.
पोमगाव येथील डोंगरांच्‍या परिसरात ससे, रानडुक्‍कर, मोर, सायाळी, अजगर, भेकर असे विविध पशुपक्षी आढळतात. पाणवठयांजवळ त्‍यांचे अनेकदा दर्शन होते. तसेच त्‍यांचा वावर दिसून येतो. दुष्‍काळामुळे जंगलातील अनेक पाणवठयांचे पाणी आटले आहे. जंगलातून पाणी, भक्ष्‍याच्‍या शोधात मानवी संपर्कात आलेल्‍या या अजगराला अज्ञात पर्यटक, ग्रामस्‍थ यांनी ठेचून मारले असण्‍याची शक्‍यता आहे. गावातील युवकांना हा अजगर बुधवार (ता.८) सकाळी गावाच्‍या अलीकडील खिंडीजवळ तोंड ठेचलेल्‍या, मृतावस्‍थेत आढळला. दुष्‍काळात पाण्‍याअभावी वन्‍यप्राण्‍यांची होणारी होरपळ यामुळे समोर आली आहे.
'अनेक वन्‍यजीव निरुपद्रवी आहेत. त्‍यांना माणसाची भिती वाटते. माणुस दिसल्‍यास ते पुन्‍हा जंगलात पळून जातात. रस्‍ते, नागरीवस्‍तीजवळ वन्‍यप्राणी दिसून आल्‍यास त्‍यांना त्‍यांच्‍या मार्गे जाऊ द्यावे. वन्‍यजीवांसाठी 
जंगलात संरक्षित पाणीसाठे करावेत. पर्यटक, ग्रामस्‍थ यांनी वन्‍यजीवांचे संवर्धन करावे.' अशी अपेक्षा स्‍थानिक युवक अमोल वाळंज, संग्राम मरवडी, नवनाथ हरगणे, पंकज वाळंज, गणेश गोसावी यांनी व्‍यक्‍त केली.

Post a Comment

 
Top