Add

Add

0
पुणे :-   पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .ही रॅली  5 जून 2016 रोजी सायंकाळी 4.30 ते 6   गरवारे बालभवन ते शनिवार वाड्या पर्यंत होति. 
या  रॅलीमध्ये चित्ररथ, पर्यावरण संवर्धन, सौरउर्जेचा वापर , पर्यावरण दिंडी , कचरा व्यवस्थापन , पर्यावरण विषयी जागृती करणारे जिवंत देखावे , पर्यावरणाचे संदेश देणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. 
या  रॅलीमध्ये  खासदार शहराध्यक्ष  वंदना चव्हाण , महापौर प्रशांत जगताप , माजी आमदार कमाल ढोले-पाटील , स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके,  सभागृह नेते बंडू केमसे, माजी महापौर वैशाली बनकर, मोहनसिंग राजपाल,  रज्लक्ष्मि भोसले , शहर कार्याध्यक्ष सुनील बनकर ,आठही विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष,सर्व सेलचे अध्यक्ष,कार्यकर्ते , नगरसेवक , माजी महापौर , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 पर्यावरण दिनानिमित्त  आयोजित रॅलीमध्ये विधान सभा मतदार संघ निहाय आकर्षक रॅली, आकर्षकदेखावे , नवीन संकल्पना, याविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्प्रधेतील विजेत्यांना अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत.  या रॅलीमध्ये  कार्यकर्ते , नगरसेवक , माजी महापौर , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top