Add

Add

0

माजी पंचायत समिती सदस्य  दत्तात्रय सुर्वे यांचा वाढदिवस साजरा… 

जामगाव (प्रतिनिधी):- 'हिंदु धर्म हा सर्वश्रेष्‍ठ धर्म आहे.तो त्‍यात असलेल्‍या संस्‍कारांमुळे.तरुणांनी आई-वडिलां कडून मिळालेले संस्‍कार आपल्‍या मुलांना द्यावेत.संस्‍कारी युवा पिढीमुळे देशाचा विकास होईल. पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचे अंधानुकरण रोखण्‍यासाठीकिर्तनकारांनी प्रबोधन करावे.धर्म जागृत ठेवावा.समाजातील अनिष्‍ठ रुढी बंद कराव्‍यात.' असे आवाहन आळंदी येथील अपंग कल्‍याण संस्‍थेचे अध्‍यक्ष लक्ष्‍मण महाराज पाटील यांनी केले.
मुळशी तालुक्यातील सुपुत्र आणि मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य व पत्रकार दत्तात्रय नारायण सुर्वे यांच्या दि २७ मे २०१६ या ५१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुळशी तालुक्यातील  जामगाव येथे मुळशी तालु क्‍यातील किर्तनकार,हार्मोनिअम वादक,गायक आदी तीनशे जणांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी तालुक्यातील मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष रामभाऊ सातपुते,माउली नादब्रह्म शिक्षण संस्थेचे संस्थापक विठठलआबा गव्हाणे,आचार्य मंदारजी ऐनपुरे,मुळशी वारकरी प्रबोधन समिती अध्यक्ष जीवनमामा खानेकर,ह.भ.प.नरहरी माझिरे ,दशरथ मानकर,सोमाजी कंधारे,विठ्ठल दहिभाते,एकनाथ दातीर,यशवंत फाले ,बबन महाराज तोंडे, दत्तात्रय कंधारे, चंद्रकांत शेडगे,देवराम फाले, ओंकार मेमाणे ,जनार्धन मालपुटे,बापूसाहेब मिंडे,गणेश कारले,तानाजी कारले,एकनाथ जांभुळकर,नथु हरगाणे,ज्ञानोबा साठे,संजय भरम ,दिलीप जोरी,पांडुरंग पारखी,निवृत्ती दातीर आदी वारकर्यांचा मानचिन्‍ह,उपरणे,शाल,धोतर,पत्‍नीला साडी देण्‍यात आली.  
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.यशवंत महाराज फाले यांनी केले तर ह.भ.प.दत्तात्रय महाराज कंधारे ,पांडुरंग पारखी ,रामभाऊ सातपुते यांनी समयोचित भाषणे केली.त्याचबरोबर तालुक्यातील कीर्तनकार, गाय नाचार्य ,हार्मोनियमवादक ,तबलावादक,मृदंगवादक ,वारकरी यांचा दत्तात्रय सुर्वे,हनुमंत सुर्वे व त्यांच्या पत्नीच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. 
 वारकरी सत्काराच्या पूर्वी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय सुर्वे यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कर करणार्यांमध्ये मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य  बाबासाहेब कंधारे,हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बांदल, उत्पादन शुल्क समिती पुणे जिल्हा सदस्या शोभाताई पासलकर,भाजप मुळशी तालुका अभियंता सेलचे अध्यक्ष आनंत ढमाले,भारतीय जनता पक्ष मुळशी तालुका युवा मोर्चाचे  अध्यक्ष नवनाथ पारखी,कार्याध्यक्ष सागर मारणे,बी.जे.पी.तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कंधारे,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरख दगडे ,मारुती कुर्पे,पप्पु सरुसे,पप्पू कंधारे, मान पंचायत समिती गण भाजप अध्यक्ष दीपक साठे, श्री.ओझरकर, आरपीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष लहुशेठ  चव्हाण,तालुका अध्यक्ष श्रॆ. जाधव, सरचिटणीस अशोक कांबळे ,पत्रकार संघ मुळशीचे माजी अध्यक्ष राजेंद्र मारणे ,नूतन अध्यक्ष रमेश संसार, कार्याध्यक्ष किसान बाणेकर,सदस्य दत्तात्रय उभे,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपसंघटक राम गायकवाड,आमित कुडले,शिवसेनेचे तालुका उप प्रमुख अनिल आधावडे,विद्यार्थी सेनेचे संघटक गणेश शिर्के,,मुळशी खुर्दचे विलास ढमाले,आरपीआयच्या अश्विनिताइ सातपुते, राष्ट्रवादीचे संतोष सुर्वे,उद्योजक  निलेश सुर्वे -पाटील,उद्योजक विनोद सुर्वे, विलास सुर्वे, भरत  सुर्वे, राजेंद्र सुर्वे ,एकनाथ सुर्वे, संतोष साठे,ज्ञानोबा  साठे, अन्य मान्यवरांचा समावेश होता 
   वारकरी,किर्तनकार,वादक समाजप्रबोधनसाठी सातत्‍याने घराबाहेर असतात.अशावेळी घराची जबाबदारी त्‍यांच्‍या पत्‍नीला पेलावी लागते.समाजाच्‍या जडणघडणीमध्‍ये वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे.किर्तन कारांनी स्‍त्रीभ्रुण हत्‍या, जलसंवर्धन, व्‍यसनमुक्‍ती, हिंदु धर्म संस्‍कृती याबाबतचे योगदान मोलाचे आहे. याची जाणिव ठेवून हा आगळा कार्यक्रम घेण्‍यात आल्‍याचे या कार्यक्रमाचे संयोजक व जामगाव-दिसली ग्रामपंचा यतचे  आदर्श सरपंच हनुंमत सुर्वे यांनी सांगितले.
पंचायत समितीचे माजी सदस्‍य दत्‍तात्रेय सुर्वे, गायक प्रकाश आधवडे, मुळशी तालुका वारकरी समाजाचे माजी अध्‍यक्ष रामभाऊ सातपुते, माजी सरपंच यशवंत मालुसरे, रामभाऊ ठोंबरे, माजी उपसरपंच सोपान डोख, वसंत सुर्वे,  आदी उपस्थित होते. किर्तनकार यशवंत फाले यांनी सुत्रसंचालन केले.  

Post a Comment

 
Top