Add

Add

0
सैराटचा ‘बोभाटा’ कोर्टात

माने यांच्या काही मित्रांनी सैराट पाहिला.त्यांना वाटले की,हे कथानक‘बोभाटा’या पुस्तकावरच बेतलेले आहे.हा चित्रपट माने यांची निर्मिती आहे. मित्रांकडून सैराटबद्दल माहि ती मिळाल्यानंतर माने  यांनी स्वतः हा चित्रपट पाहिला. यामधील पुरुष आणि स्त्री पात्रांची अदलाबदल सोडली तर संपूर्ण चित्रपट ‘बोभाटा’च आहे,असे माने यांचे म्हणणे आहे. बोभाटामध्ये पुरुष पात्र श्रीमंत आणि उच्च वर्गातील दाखवले आहे. चित्रपटात मात्र नायिका या भूमिकेत आहे.
यशाला हजार बाप असतात. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला मराठी चित्रपट सैराटही याला अपवाद ठरलेला नाही. सैराटचे कथानक आपल्या ‘बोभाटा’ या पुस्तकावर आधारित असल्याचा दावा करीत नवी मुंबईस्थित लेखक नवनाथ माने यांनी फसवणूक आणि कॉपी राईटचा भंग केल्याबद्दल कोर्टात तक्रार दाखल केली आहे. गेल्या शुक्रवारी पनवेल कोर्टात ही तक्रार दाखल झाली. याचदिवशी कोर्टाने माने यांचे म्हणणे ऐकून घेतले. पुढील सुनावणी शुक्रवारी 24 जून रोजी होणार आहे. दरम्यान सैराटची कथा ही निव्वळ आपलीच कल्पना आहे. वर्षभर आपण या कथानकावर काम केल्याचे स्पष्टीकरण चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिलेय. त्यामुळे कोर्टात कशापद्धतीने युक्तीवाद होतात याची आता उत्सुकता आहे. 
‘बोभाटा’ हे पुस्तक 2010 मध्ये प्रकाशित झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यावेळचे अध्यक्ष कै. नरेंद्र दाभोळकर यांनी या पुस्तकाची प्रशंसा केली होती. गावातील प्रतिष्ठित मंडळी आंतरजातीय विवाहाला विरोध करतात, याचे चित्रण पुस्तकातआहे. सैराटचेही कथानक असेच आहे, असा दावा माने यांनी केला आहे. 
सुप्रसिद्ध विनोदी लेखक द.मा. मिराजदार यांची ‘बोभाटा’ला प्रस्तावना लाभली आहे. या कथेवर चित्रपट निघायला हवा असा अभिप्राय या प्रस्तावनेत असल्याचे माने यांचे म्हणणे आहे.  हे पुस्तक लिहिताना लेखकाने आपले कौशल्य पणाला लावले असून याचे कथानकच एखाद्या चित्रपटाची पटकथा बनू शकते असेही मिराजदार यांनी लिहिल्याचे माने म्हणतात.

Post a Comment

 
Top